vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई

ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई

 

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यात ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्रे (UAV) याचा वापर काही असामाजिक तत्वांकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्रे (UAV) अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी त्वरित त्यास प्रतिबंध करणे गरजेचे असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये दिनांक 14 मे 2025 पासून दि. 3 जून 2025 पर्यत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे हद्दीत कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्रे (UAV) यंत्र चालविण्यास, उडविण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

कोणतीही व्यक्ती आदेशाचे उल्लंघन करील तो भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 तसेच इतर लागू असलेल्या कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, असे ही प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार यांचा निर्धार

केंद्राकडे प्रलंबित असलेला रोजगार हमी योजनेचा निधी राज्यास तत्काळ मंजूर करावा- : रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी बीडच्या विकासाला नवी गती; १७ सप्टेंबरला रेल्वेची पुण्याशी तर डिसेंबरमध्ये मुंबईशी जोडणी कालबद्ध आराखडा तयार करून युद्ध पातळीवर काम करण्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

नाफा २०२५ महोत्सवात यंदा भरगच्चं कार्यक्रम!-२५ ते २७ जुलै रोजी सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी तारेतारकांच्या उपस्थितीत रंगणार भव्य ग्लॅमरस मराठी चित्रपट महोत्सव!

vishwatmaklokswamivarta

महापौर सुजाता पाटील यांनी विशेष बैठकीत घेतला पावसाळी स्थितीचा सविस्तर आढावा 

विधानसभा लक्षवेधी सूचना -नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्य वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta