vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

असंसर्गिक आजार अंतर्गत कॅन्सर व्हॅनमध्ये रुग्ण तपासणी…

असंसर्गिक आजार अंतर्गत कॅन्सर व्हॅनमध्ये रुग्ण तपासणी…

नवी मुंबई प्रतिनिधी  – नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्र स्तरावर दैनंदिन स्तरावर राष्ट्रीय असांसर्गिक रोग तपासणी कार्यक्रम अंतर्गत ३० वर्षावरील स्त्री व पुरुषांची तपासणी करण्यात येते व त्याची नोंदणी पोर्टल वर करण्यात येते. सदर कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग याबाबत तपासणी व चाचण्या केल्या जात आहेत. तसेच संशयित रुग्ण सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ येथे संदर्भित करण्यात येत आहेत .

   नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत दिनांक 21/5/2025 ते 24/5/2025 कालावधीत शासनामार्फत कॅन्सर व्हॅन नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात पाठविण्यात येणार असून सदर व्हॅनमध्ये मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग याबाबत तपासणी व चाचण्या करण्यात येणार आहेत. सदर मोहीमेचे नियोजन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेले आहे.अक्र दिनांक ना.प्रा.आ.केंद्र व्हॅन पार्क स्थळ वेळ नोडल पर्सन,व्हॅन लोकेशन ठिकाणी रुग्ण पाठविणे करिता नागरी आरोग्य केंद्रांची नावे

1-21.5.2025,ना.प्रा.आ.के ऐरोली जनरल हॉस्पिटल सेक्टर 3 सकाळी ९ पासून सुरू होईल डॉ. सचिन चिटणीस,दिघा, इलठाणपाडा, चिंचपडा, कातकरीपाडा, ऐरोली, राबाडा.

2/22.5.2025 ना.प्रा.आ.के पावणे नमुमपा स्कूल श्रमिकनगर डॉ. वंदना नारायणीपावणे, नोसील नाका, घणसोली, घणसोली 4, कोपेरखैरणे, कोपेरखैरणे-14, कोपेरखैरणे-16, महापे.

3= 23.5.2025 ना.प्रा.आ.के जुहूगाव ना.प्रा.आ.के मैदान, जुहूगाव

डॉ. विद्या वर्मा,जुहूगाव, वाशी, तूर्भे, इंदिरानगर, सानपाडा.

4-24.5.2025 ना.प्रा.आ.के नेरूळ 1 सार्वजनिक रुग्णालय नेरूळ, सेक्टर 15 डॉ. सुरेश पाटील शिरवणे, नेरूळ-1, नेरूळ-2, करावे, सेक्टर-48, सीबीडी, कुकशेत.

तरी, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 30 वर्षावरील स्त्री व पुरुष लाभार्थी यांनी राष्ट्रीय असांसर्गिक रोग तपासणी कार्यक्रमांतर्गत आपल्या जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी तसेच संशयित कर्करोग आढळून आल्यास कॅन्सर व्हॅन लोकशेनच्या नमूद ठिकाणी नियोजित कालावधीत तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

भारताने पहिले स्वदेशी प्रतिजैविक “नॅफिथ्रोमायसिन” विकसित केले, जे प्रतिरोधक श्वसन संसर्गाविरुद्ध प्रभावी आहे, विशेषतः कर्करोग आणि अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत ऑनलाईन योग प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष- उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळेदोन वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरा व खेळणी संच..

सांगली जिल्ह्यात २००८ रुग्णांना सुमारे १४.४० कोटींची मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप*

कुष्ठरुग्ण शोध अभियान…

vishwatmaklokswamivarta