vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शासनाच्या जनकल्याणकारी योजना माध्यमांनी नागरिकांपर्यंत पोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासनाच्या जनकल्याणकारी योजना माध्यमांनी नागरिकांपर्यंत पोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

 

 

मुंबई, प्रतिनिधी: राज्य शासन हे लोकांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. याबरोबरच शेतकरी, तरुण व ज्येष्ठांसाठीही योजना राबविण्यात येत आहेत. लोकांच्या हिताच्या या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोचविण्याचे काम माध्यमांनी करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

 

सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा या राजकीय साप्ताहिकाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज बीकेसीतील आयएनएस टॉवर येथील साम टीव्हीच्या कार्यालयात झाला. यावेळी सकाळचे मुख्य संपादक निलेश खरे, संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपाले, सुरेंद्र पाटसकर यांच्यासह विविध आवृत्यांचे संपादक उपस्थित आहेत.

 

यावेळी साम टीव्हीच्या वतीने मुख्य संपादक श्री. खरे यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मुलाखत घेतली.

 

सकाळ माध्यम समूहाच्या नव्या सरकारनामा या साप्ताहिकाच्या शुभारंभास शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासन अनेक लोकोपयोगी व कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजना लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, त्यासाठी माध्यमांनीही सहकार्य करावे. तसेच बातम्या देताना माध्यमांनी दोन्ही बाजू जाणून घेऊन वस्तुनिष्ठ माहिती लोकांपुढे मांडावी.

 

गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने अनेक प्रकल्पांना चालना दिली तर अनेक नवीन प्रकल्प सुरू केले. वॉर रूमच्या माध्यमातून या प्रकल्पांवर सनियंत्रण ठेवले.

 

समृद्धी महामार्ग, अटल सेतू, सागरी किनारा मार्ग, मेट्रो अशा प्रकल्पामुळे वाहतूक जलद झाली असून वेळ व इंधन वाचण्यास मदत होत आहे. लवकरच मेट्रो 3 सुरू होणार असून यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार असून लाखो लोकांचा प्रवास सुखकर होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

श्री.शिंदे म्हणाले की, विकास प्रकल्पांना चालना देतानाच दुसरीकडे आम्ही अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना, मुख्यमंत्री वयोश्री, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लेक लाडकी व लखपती दिदी अशा योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार करून या योजना सुरू केल्या आहेत. राज्यातील शेतकरी, महिला, तरुण व ज्येष्ठ अशा सर्व घटकांचा विचार हे शासन करत आहे. या सर्व योजनांसाठी निधीची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी यंदाच्या वर्षी 33 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या लाभाच्या रकमेत पुढील काळात वाढ करण्यात येईल. ही योजना बंद होणार नाही असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाच्या सर्वेक्षणासदि.2 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच खडसावले…

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौत आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल,कंगनाने देशाची माफी मागावी.

vishwatmaklokswamivarta

गुन्हयांच्या सिद्धतेकरीता गडचिरोली पोलीस दलात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल,पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते  अनावरण..

अंमली पदार्थांची वाढती तस्करी, अनधिकृत बांधकामे यांचेवर कारवाई न झाल्यास २ सप्टेंबरलाआझाद मैदानात आंदोलन..