vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ऑटो-रिक्षा चालक व मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन..

ऑटो-रिक्षा चालक व मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन..

 

 

सांगली,  प्रतिनिधी: परवानाधारक ऑटो-रिक्षा चालक व मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी शासन निर्णय दि. 16 मार्च 2024 नुसार ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन केले आहे. ही योजना परवानाधारक व मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑटो-रिक्षा चालक व मिटर्ड टॅक्सी चालकांकडे अनुज्ञप्ती (लायसेन्स) व बॅज असणे आवश्यक आहे. परिवहन कार्यालयाकडडून नोंदणीकृत चालकांना ओळखपत्र जारी केले जाईल. या योजनेची नोंदणी/ओळखपत्र शुल्क रक्कम 500 रूपये वार्षिक सभासद शुल्क 300 रुपये इतके आहे. अर्जासोबत नोंदणी शुल्क मंडळाच्या अधिकृत बँक खात्यामध्ये जमा करावे. कोणत्याही परिस्थितीत सदस्यत्व शुल्काची रक्कम रोख स्वरुपात अथवा क्युआर कोड द्वारे भरणा केला जाणार नाही याची दक्षता सदस्य नोंदणी करतेवेळी घ्यावी. योजनेच्या अधिक माहिती करीता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली यांच्याशी संपर्क साधवा.

संबंधित पोस्ट

मेट्रो 3 : गोरेगाव येथील आरे कॉलनी  ते बांद्रा बीकेसी पहिला टप्पा नव्या वर्षात होणार सुरु- अश्निनी भिडे..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्रकल्पां मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्यासाठी शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील अन्य ठिकाणची ६० ते १०० हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक  

महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती· 2024-25 मध्ये देशाच्या 40 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात· गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक….

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत6, 7 डिसेंबरला ग्लोबल युथ फेस्टिव्हल 2025

vishwatmaklokswamivarta

शालेय राज्यस्तर मल्लखांब स्पर्धा -मुलांच्या गटात कोल्हापूर तर मुलींच्या गटात मुंबई विभागास विजेतेपद- जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या संघांना व खेळाडुंना पारितोषिक वितरण..

vishwatmaklokswamivarta