vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

 

राज्य प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर,- १७ सप्टेंबर, २०२४ रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन संपूर्ण विभागात साजरा करण्यात येणार आहे. विभागीय मुख्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रम सिध्दार्थ उद्यान, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी ९.०० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.

 

सिध्दार्थ उद्यान येथे होणाऱ्या या मुख्य शासकीय समारंभात जास्तीत जास्त व्यक्तीना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था यांनी त्यांचे कार्यालयाचा ध्वजारोहण समारंभ सकाळी ०८.३० ते ०९.३० या कालावधीत आयोजित करु नये. त्यांनी त्यांच्या कार्यालयाचे ध्वजारोहण समारंभ सकाळी ०८.३० पूर्वी किंवा ०९.३० च्या नंतर आयोजित करावेत.

 

 

मुख्य ध्वजारोहण समारंभाला सर्व प्रादेशिक अधिकारी, विभागीय प्रमुख, जिल्हास्तरीय अधिकारी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे तसेच उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींनी समारंभाच्या वेळी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

**

संबंधित पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा,अचानक..सेटवर कोसळली हॉस्पिटलमध्ये केले दाखल

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील घेणार गुरुवारी (दि.२०) आढावा बैठक

सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत कामांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार..

पैठण येथे नाथषष्ठी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा…

प्रतापगडा’प्रमाणे ‘विशाळगड’ अतिक्रमण मुक्त होण्यासाठी दादर येथे मूकनिदर्शन !मुक्त झाला प्रतापगड, वाट पहातोय विशाळगड ! – हिंदु जनजागृती समिती