vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आम्ही भाग्यवंत: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मानलाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या भावना..

आम्ही भाग्यवंत: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मानलाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या भावना..

 

 राज्य प्रतिनिधी

धाराशिव, (परंडा): मुख्यमंत्री सशक्तीकरण अभियान अंतर्गत शासनाच्या योजनेचा आम्हाला लाभ मिळाला आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इतक्या मोठ्या समारंभात या लाभाचे सन्मानपत्रही मिळाले. खरेच आमच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे, असे सांगत महिला सक्षम होण्यासाठी या योजना चालू राहिल्या पाहिजे अशा भावना प्रत्येक लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या.

 

प्रसंग होता धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील कोटला मैदानावर आयोजित महिला सशक्तिकरण अभियानाचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओमंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्यासह मान्यवर आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच विविध विभागा अंतर्गत लाभधारक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थी महिलांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी उषा पवार, जयश्री जाधव, अज्ञान कांबळे, वर्षा शेंडगे, लक्ष्मी टिळेकर, विठाबाई लोखंडे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचा लाभ मिळालेल्या राजश्री पाटील, रेशीम उद्योग विकास अंतर्गत तुती लागवडीसाठी चार लाख रुपयांचा लाभ मिळालेल्या छाया अंधारे, लखपती दीदी योजनेअंतर्गत शेती, दुग्ध व टेलरिंग व्यवसायासाठी अनुदानाचा लाभ मिळालेल्या पुष्पा सावंत तसेच महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत शेळीपालन व्यवसायासाठी अनुदानाचा लाभ मिळालेल्या रत्नमाला देशमुख या महिलांनी यावेळी शासनाचे आभार मानले.

**

संबंधित पोस्ट

मुंबई शहर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान माहीम विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ५५८ तर कुलाबा मतदारसंघात २४१ ज्येष्ठ मतदारांचे मतदान

vishwatmaklokswamivarta

सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवासाठी २० हजार भाविकांची उपस्थित !**हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच !* – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था

वन विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी सदैव प्रयत्न – मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण,कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या पहिल्या सत्राचा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहिर…

महाराष्ट्र विधानसभा स्पीकर निवडणुक भाजपाच्या राहुल नार्वेकर विरूद्ध शिवसेनेचे राजन साळवी विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत…

गिरीजा शंकर यांचे ‘रंग मंच’ भावी पिढ्यांकरिता संदर्भ ग्रंथ ठरेल- राज्यपाल रमेश बैस