vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेश

मौजपुरी येथील अजिंक्य ढोकळे 14 वर्ष वयोगटात कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम; तालुका स्तरावरही आला होता प्रथम; कुस्तीने वेधले सर्वांचे लक्ष

मौजपुरी येथील अजिंक्य ढोकळे 14 वर्ष वयोगटात कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम; तालुका स्तरावरही आला होता प्रथम; कुस्तीने वेधले सर्वांचे लक्ष

 

 

 

जालना प्रतिनिधी तालुक्यातील मौजपुरी येथील अजिंक्य सत्यनारायण ढोकळे या विद्यार्थ्याने तालुका स्तरावर 41 वजन गटात 14 वर्षा खालील कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर आज शुक्रवार दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा स्तरिय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याची आता पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

 

जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. दरम्यान आज 14 वर्षाखालील 41 वजन गटातील कुस्ती स्पर्धेत या स्पर्धेत मौजपुरी येथील अजिंक्य सत्यनारायण ढोकळे या विद्यार्थ्याने रंगतदार कुस्ती करीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कुस्तीचा डाव खेळत अजिंक्य ढोकळे याने प्रतिस्पर्धकाला चितपट करीत कुस्ती जिंकली.जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत अजिंक्य ढोकळे याने प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान मिळविला आहे. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सरपंच बद्रीणारायण भसांडे, सत्यनारायण ढोकळे, बालाजी बळप, अंकुश काळे, अच्युत मोरे, कृष्णा हिवाळे यांच्या सह गावकर्यांनी अभिनंनद केलंय.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य जिल्ह्यातील 73 महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती· बुलडाणा, लोणार तालुक्यातील 19 गावांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित

vishwatmaklokswamivarta

कामगारांना लाभ देण्यासाठी कोणतेही शुल्क नाही;पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुरीमध्ये चक्रीवादळ ‘मोंथा’चा परिणाम दिसू लागला आहे  जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे लाईफगार्ड आणि अग्निशमन विभागाने पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याजवळ जाण्यापासून आणि समुद्रात अंघोळ करण्यापासून रोखले आहे. सर्वांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन. 

vishwatmaklokswamivarta

मेनोपॉजल वुमन्स सोसायटीमार्फत सार्वजनिक आरोग्य विभाग व विलासराव देशमुख फाउंडेशन लातूर यांच्या माध्यमातून रजोनिवृत्ती नंतरच्या स्त्रियांमध्येअसंसर्गजन्य आजारांवर संशोधन..

रेमंड लक्झरी कागल कंपनीने कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

जिल्ह्यात आज सहा नामनिर्देशनपत्र दाखल-अलिबाग, महाड, पेण आणि उरण मतदारसंघात अर्ज दाखल

vishwatmaklokswamivarta