vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी होणार रोजगार मेळावे

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी होणार रोजगार मेळावे

 

 

 

ठाणे प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील, असे या योजनेचे स्वरुप आहे.

 

या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन ठाणे जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे दि.२० सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधी मध्ये आयोजित करण्याच्या सूचना मंत्री, कौशल्य विकास, रोजगार व नाविन्यता यांनी दिलेल्या आहेत.

 

ठाणे जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पुढीलप्रमाणे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

1. सोमवार दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, ठाणे.

 

2. मंगळवार दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, कल्याण.

 

3. बुधवार दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, उल्हासनगर.

 

4. गुरुवार दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, अंबरनाथ.

 

5. शुक्रवार दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, भिवंडी.

 

6. शुक्रवार दि. 27. सप्टेंबर 2024 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, मुरबाड.

 

7. शनिवार दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, नवी मुंबई.

 

8. सोमवार दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शहापूर.

 

तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे सहायक आयुक्त श्रीमती संध्या स. साळुंखे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय-बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेद अभियान वचनबध्द- मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर,महालक्ष्मी ट्रेड सरस मध्ये कोट्यावधींची उलाढाल..

vishwatmaklokswamivarta

इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेतील लाभार्थ्यांनी मोबाईल ॲपद्वारे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

डाक विभागात एजंटसाठी अर्ज मागविले; 17 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण ना नफा ना तोटा तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना;सन २०२३-२४ अर्ज करण्यास मुदतवाढ..

vishwatmaklokswamivarta

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जमीन विक्रेत्यांनी संपर्क साधावा