vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत विविध क्षेत्रातील आस्थापनेमध्ये प्रशिक्षणार्थी निवडीसाठी शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये निवड मेळावा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत विविध क्षेत्रातील आस्थापनेमध्ये प्रशिक्षणार्थी निवडीसाठी शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये निवड मेळावा

 

 

 

   राज्य प्रतिनिधी     सांगली  : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत सर्व आस्थापनेमध्ये कार्य प्रशिक्षणासाठी उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन दिनांक 21 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी आपल्या आस्थापनेमध्ये प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी तसेच बेरोजगार उमेदवारांनी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त. एस. एस. पवार यांनी केले आहे.

 

सांगली जिल्ह्यातील विविध शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित उमेदवार निवड मेळाव्याची तारीख व ठिकाण पुढीलप्रमाणे. दि. 24 व 25 सप्टेंबर रोजी शासकीय ओैद्योगिक प्रशिक्षण संस्था शिराळा, दि. 21 व 23 सप्टेंबर रोजी शासकीय ओैद्योगिक प्रशिक्षण संस्था विटा, दि. 23 व 24 सप्टेंबर रोजी शासकीय ओैद्योगिक प्रशिक्षण संस्था तासगांव, दि. 24 व 27 सप्टेंबर रोजी शासकीय ओैद्योगिक प्रशिक्षण संस्था इस्लामपूर व पलूस, दि. 26 व 27 सप्टेंबर रोजी शासकीय ओैद्योगिक प्रशिक्षण संस्था आटपाडी, दि. 23 व 27 सप्टेंबर रोजी शासकीय ओैद्योगिक प्रशिक्षण संस्था कडेगाव, दि. 26 व 30 सप्टेंबर रोजी शासकीय ओैद्योगिक प्रशिक्षण संस्था जत व कवठेमहांकाळ, दि. 25 व 30 सप्टेंबर रोजी शासकीय ओैद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली.

 

प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी आस्थापनेवर किमान 10 कर्मचारी असणे आवश्यक असून निवड मेळाव्यामध्ये टॅन, पॅन, उद्योग आधार, ईएसआयसी, जीएसटी इत्यादी कागदपत्रे घेवून उपस्थित रहावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 35 वयोगटातील उमेदवार पात्र राहील. निवड झालेल्या उमेदवाराना इ. 12 वी पास 6 हजार रूपये, डिप्लोमा/आयटीआय 8 हजार रूपये व पदवी/पदव्युत्तर 10 हजार रूपये इतके विद्यावेतन सहा महिनेपर्यंत अदा करण्यात येणार आहे. ही योजना सहा महिन्यासाठी असेल.

 

सांगली जिलह्यातील सर्व आस्थापनानी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जागा अधिसूचित कराव्यात. हे संकेतस्थळ बंद असेल तरीही आस्थापनेनी ऑफलाईन पध्दतीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयास जागा कळवाव्यात ‍किंवा मेळाव्याच्या ठिकाणी कागदपत्रे घेवून प्रत्यक्ष रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊ शकतात. जिल्ह्यातील विविध शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Govt. I.T.I ) येथे उमेदवारांनी दिलेल्या तारखेस उपस्थित रहावे.

 

उमेदवाराची पात्रता – किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास/ आयटीआय/ पदवीका/पदवी/पदव्युत्तर असावी (मात्र, शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत). उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे आधार नोंदणी असावे. बँक खाते आधार संलग्न असावे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

 

आस्थापना/उद्योगासाठीची पात्रता – आस्थापना/उद्योग महाराष्ट्रात कार्यरत असावा. आस्थापना/उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची असावी. आस्थापना/उद्योगानी ईपीएफ, ईएसआयसी, जीएसटी, सर्टीफिकेट ऑफ इन कॉर्पोरेशन, डीपीआयटी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी. अधिक माहितीसाठी 0233-2990383 या दुरध्वनी क्रमांकावर व sanglirojgar@gmail.com या ई.मेल वर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

गडचिरोली जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट: *नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

डर्बन येथे होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धेसाठी भारतीय स्पर्धकांमध्ये जालन्याच्या जितेंद्र अग्रवाल यांचा समावेश

मतदान शांततेत पार पडावे म्हणून जिल्ह्यात मनाई आदेश-7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅली उत्साहात संपन्न

मार्जिन मनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बोगस बियाणे- कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन कायदा आणणार – केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी ३६७ कोटींचा निधी वितरित