
समर्थनम ट्रस्ट फॉर दि डिसेबल संस्थेच्यावतीने दिव्यांग आणि गरजू युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
मुंबई प्रतिनिधी ( सुरेश गायकवाड )
मुंबई- समर्थनम ट्रस्ट फॉर दि डिसेबल संस्थेच्यावतीने दिव्यांग आणि गरजू युवकांसाठी मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी नवी मुंबई येथे करण्यात आले असून दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वा. ते ३.०० वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे या संस्थेचे समन्वयक जितेंद्र कर्णिक यांनी सांगितले. त्यावेळेस मानसी , तेजल रिशिकेश, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळेस त्यांनी सांगितले की, दहावी, बारावी, पदवी, पदविका धारक युवक युवती यांनी मोफत रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन त्याचा फायदा करून घ्यावा. आणि मेळाव्यात येताना ५ प्रती बायोडाटा, ५ पासपोर्ट साइज फोटो, शिक्षणाच्या प्रती, आणि अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्राच्या प्रती, ओळखपत्र ( आधार कार्ड ) आदी कागदपत्रासह यावे असेही त्यांनी सांगितले.
या मेळाव्यासाठी मोफत नोंदणी ही सकाळी ९.०० वा . सुरु राहणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९१ ६३६४८६७८११/६३६४८६७८०७/९०८२७५१८४३ असे आवाहन त्यांनी केले आहे.



