
महाविकास आघाडी कामाला लागली….महायुतीचा मात्र उमेदवार ठरेना,महायुतीचा उमेदवार जाहीर होईना,भाजप- शिंदेसेना-अजीत पवार गटाचे कार्यकर्ते अस्वस्थ
राज्य प्रतिनिधी
जालना:येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.घनसावंगी विधानसभेत महाविकास आघाडीकडून राजेश टोपे यांची उमेदवारी फिक्स असून ते कामाला लागले आहेत.परंतु,महायुतीत ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला जाणार हे ठरलेले नाही.घनसावंगी विधानसभेची जागा भाजप,शिंदे सेना की अजित पवार गटाला मिळणार याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाल्याने महायुतीचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत.जो उमेदवार आधी कामाला लागतो त्याला निवडणुकीत नियोजन करणे सोपे जाते.सध्या राजेश टोपे आणि सतीश घाटगे हे मतदारसंघ पिंजून काढत आहेत.तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ही जागा निश्चित असल्याचे जमा आहे.त्यामुळे राजेश टोपे यांचे पारंपारिक विरोधक असलेले ठाकरे गटाचे हिकमत उढान हे पक्ष बदलासाठी मोठे प्रयत्न करत आहेत.तिकिटासाठी ते अजित पवार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत.परंतु,त्यांचा पक्षप्रवेश कोणत्याच पक्षात होत नसल्याने त्यांचे समर्थक संभ्रमावस्थेत आहेत,अशी चर्चा मतदारसंघात आहे.
सतीश घाटगे यांच्याकडे जनतेचा ओढा
समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.त्यामुळे जनतेचा त्यांना पाठिंबा वाढला असून गावागावातून त्यांच्याकडे कार्यकर्ते युवक,शेतकरी यांचा ओढा वाढला आहे.महायुतीची जागा कोणाला जरी सुटली तरी सतीश घाटगे हे प्रबळ उमेदवारीचे दावेदार मानले जात आहे.त्यामुळे जनता त्यांना जाहीर पाठिंबा देत असल्याने त्यांचं पारडे दिवसेंदिवस जड होत चालले आहे.
हिकमत उढाण यांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष
हिकमत उढाण लवकर भूमिका घेतील असे अपेक्षित होते.त्यांचे समर्थक अनेक महिन्यापासून त्यांच्या भूमिकेकडे वाट पाहत आहे.परंतु हिकमत उढांण यांनी अद्यापही आपली भूमिका जाहीर केली नाही.महाविकास आघाडी त्यांना तिकीट देणार नसल्याने ते कोणत्याही पक्षाचे तिकीट घेऊन निवडणुकीत उभा राहणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.सध्या ते शिवसेना तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.त्यांच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशाची चर्चा मतदारसंघात होती.परंतु या चर्चेला तूर्तास विराम लागला आहे.
राजेश टोपे यांचे शांततेत कार्यक्रम..
गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत राजेश टोपे यांनी अनेक निवडणुका हाताळलेल्या आहे.त्यांच्याकडे निवडणुकीचे कसब आहे.त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वेळेस राजेश टोपे यांनी शांततेत निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.दररोज सामाजिक मेळावे,धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमातून जनतेमध्ये ते सक्रिय झाले आहे.
घनसावंगीच्या जनतेची परिवर्तनाची भूमिका
घनसावंगी मतदारसंघाचे नेतृत्व गेल्या पंधरा वर्षापासून राजेश टोपे करत आहे.जनतेचे प्रश्न आणि मतदारसंघाच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे.त्यांनी दिलेल्या अनेक आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याचे मतदार सांगत आहेत.जनतेमध्ये नाराजीची भावना असून २०२४ च्या निवडणुकीत परिवर्तनाची भूमिका जनता घेत असल्याची मतदारसंघात दिसत आहे.



