vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम,राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 (एफ) वर जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी..

महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम,राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 (एफ) वर जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी..

 

 

रायगड प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम महिलांकरीता शासनाने लागू केलेल्या विविध शासकीय योजनांच्या माहितीचा विस्तृत प्रमाणावर प्रसार करण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. 09 ऑक्टोबर 2024 रोजी मोर्बा, ता. माणगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाकरीता मा.मुख्यमंत्री, मा.उप मुख्यमंत्री व इतर मंत्री महोदय हे उपस्थित राहणार आहेत.

 

या कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाकरीता 800 ते 900 बसेस व इतर लहान मोठी अशी वाहने येण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम मोर्बा, ता. माणगांव गावचे हद्दीत रोडजवळील मैदानावर माणगाव ते दिघी येथे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 (एफ) च्या बाजूला असणाऱ्या मैदानावर होणार आहे. या रोडवर जड-अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी या मार्गावरुन जड-अवजड वाहतूक सुरु राहिल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होवून कार्यक्रमाच्या वेळी गंभीर प्रश्न उद्भवू शकतो. महामार्गावर अपघात होवू नये तसेच कार्यक्रमाकरीता येणारे नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे तसेच महाराष्ट्र शासनाच्या महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचे अनुषंगाने जड-अवजड वाहनांमुळे जागोजागी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दि.09 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6.00 ते सायं. 17.00 वाजेपर्यत रायगड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 (एफ) यावर म्हसळा ते माणगाव वरुन होणारी ट्रेलर, कंटेनर, ट्रक/डंपर व इतर सर्व अशी अवजड वाहने ज्याची क्षमता 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा सर्व जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे.

 

यावेळी अवजड वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून 1) म्हसळा मांदाड तळामार्गे रोहा नागोठणे, 2) म्हसळा साई- तळेगाव तळा – इंदापुर व 3) म्हसळा साई चेकपोस्ट कनघर खामगाव- पुरार फाटा- गोरेगांव मार्गे मुंबई बाजुकडे व गोवा बाजूकडे जाणाऱ्या मार्गावरुन वाहतूक करण्याबाबत या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

ही वाहतूक बंदी अधिसूचना ही दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहीका, तसेच महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी येणारी वाहने यांना लागू राहणार नाही.

 

०००००००

संबंधित पोस्ट

मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त ‘शोज’ मिळवून देण्यासाठी समिती स्थापन -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी,दिली शहापूर तालुक्यातील विविध ठिकाणी भेट..

vishwatmaklokswamivarta

करोना रुग्णांची संख्या वाढली, मुंबईत पुन्हा एकदा मास्कसक्ती होण्याची शक्यता..

अल्पसंख्याकांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी-शासनाच्या विविध योजना

vishwatmaklokswamivarta

खासदारकी लढण्याचा जनाग्रह : निवडून आणण्याचाही जनमनाकडून होतोय दावा

महाराष्ट्राचे राज्यपालांच्या दौऱ्या पूर्वी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली शासकीय विश्रामगृहाची पाहणी