vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी,दिली शहापूर तालुक्यातील विविध ठिकाणी भेट..

अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी,दिली शहापूर तालुक्यातील विविध ठिकाणी भेट..

ठाणे, प्रतिनिधी:- अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी आज शहापूर तालुक्यातील तहसिलदार कार्यालय, तलाठी कार्यालय, ॲग्रीस्टॅक शिबिर, आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा इत्यादी ठिकाणी भेटी देवून तेथील आढावा घेतला.

या दौऱ्यात त्यांनी तहसिलदार कार्यालयाला भेट देवून शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने कार्यालय परिसराची पाहणी केली व बैठक घेवून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच त्यांनी वाशिंद तलाठी कार्यालय व मंडळ कार्यालय येथे दप्तर तपासणी केली व वाशिंद येथील जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांसोबत हितगुज केला. त्याचप्रमाणे वाशिंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देवून तेथील ओपीडी, लॅबला भेट देवून तेथील कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये-धुळे यांनी दहागाव येथील ॲग्रीस्टॅक शिबिराला भेट देवून शेतकऱ्यांसोबत त्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला, त्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या या कृतीने प्रभावित होवून शेतकऱ्यांनी त्यांना फळभाज्या भेट म्हणून दिल्या.

यावेळी शहापूर तहसिलदार परमेश्वर कासुळे, तलाठी, मंडळ अधिकारी, वाशिंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक-विद्यार्थी व शेतकरी उपस्थित होते.00000

संबंधित पोस्ट

ई-पीक पाहणी नोंदणी २४ मेपूर्वी करा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आवाहन

देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी अभियंत्यांनी योगदान द्यावे-महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 41व्या राष्ट्रीय विद्युत अभियांत्रिकी अधिवेशनात केले आवाहन 40 कोटीतून मेळघाटातील दुर्गम भागातील 22 गावांमध्ये वीज

मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळाला उपाध्यक्ष अ.जावेद यांची भेट-विविध विषयाचा घेतला आढावा

पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हाधिकारींचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश**नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश; एसडीआरएफ पथके तैनात*

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा;एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना- अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर