vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा..

 शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा..

 

राज्य प्रतिनिधी- येत्या आंबिया बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरिता कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. सन 2024-25 च्या आंबिया बहाराकरीता योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी विमा पोर्टल सुरु झाले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी निर्धारीत केलेल्या कालावधीत योजनेमध्ये सहभागी होऊन कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून फळबागांचे संरक्षण करा, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.

योजनेची वैशिष्टये :

· कोकण विभागामध्ये अधिसूचीत केलेल्या महसूल मंडळात केळी, आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. (आंबा, काजू – 5 वर्षे)

· कर्जदार शेतकरी व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल.

· खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कूळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही ही योजना लागू राहील.

· एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकांसाठी 4 हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल.

· विमा अर्ज सोबत फळबागेचा जीओ टॅगिंग (geo tagging) असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील.

· एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच बहाराकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल.

· ही योजना ठाणे जिल्हामध्ये एचडीएफसी. एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत; पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत व रायगड जिल्हामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी लि. मार्फत राबविण्यात येत आहे.

· शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीवर फळपीकाची नोंद करणे बंधनकारक आहे.

· फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत केळी पिकाकरीता दि. 31 ऑक्टोबर 2024 तर काजू व आंबा पिकाकरीता दि. 30 नोव्हेंबर 2024 आहे.

विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर (रु./हेक्टर) :

: ठाणे जिल्हा:-

आंबा फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 17 हजार.

काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 20 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 6 हजार.

केळी फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा-8 हजार 500.

पालघर जिल्हा –

आंबा फळपिक- विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा-21 हजार250.

काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 20 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 6 हजार.

केळी फळपिक- विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार,विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 8 हजार 500

रायगड जिल्हा-

आंबा फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार,विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा-14 हजार 450.

काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 20 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 6 हजार.

रत्नागिरी जिल्हा –

आंबा फळपिक-विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार,विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा- 13 हजार 600.

काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 20 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 6 हजार.

सिंधुदुर्ग जिल्हा –

आंबा फळपिक-विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार,विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 8 हजार 500.

काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम 1 लाख 20 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 6 हजार.

केळी फळपिक- विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार,विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – 8 हजार 500

फळपिकनिहाय हवामान धोके व संरक्षण कालावधी :

केळी फळपीक-समाविष्ट धोके-कमी तापमान-विमा संरक्षण कालावधी-दि.01 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी.

केळी फळपीक – समाविष्ट धोके – वेगाचा वारा – विमा संरक्षण कालावधी – 01 मार्च ते 31 जुलै.

केळी फळपीक – समाविष्ट धोके – जास्त तापमान – विमा संरक्षण कालावधी – 01 मे ते 31 मे.केळी

[फळपीक- समाविष्ट धोके-गारपीट (ऐच्छिक)-विमा संरक्षण कालावधी-01 जानेवारी ते 30 एप्रिल.

काजू फळपीक- समाविष्ट धोके-अवेळी पाऊस-विमा संरक्षण कालावधी – 01 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी.

 

काजू फळपीक – समाविष्ट धोके-कमी तापमान- विमा संरक्षण कालावधी – 01 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी.

काजू फळपीक – समाविष्ट धोके – गारपीट – विमा संरक्षण कालावधी – 01 जानेवारी ते 30 एप्रिल.

आंबा फळपीक – समाविष्ट धोके-अवेळी पाऊस – विमा संरक्षण कालावधी – 01 डिसेंबर ते 31 मार्च.

आंबा फळपीक – समाविष्ट धोके – अवेळी पाऊस – विमा संरक्षण कालावधी – 01 एप्रिल ते 15 मे.

आंबा फळपीक – समाविष्ट धोके – कमी तापमान – विमा संरक्षण कालावधी – 01 जानेवारी ते 10 मार्च.

आंबा फळपीक – समाविष्ट धोके – जास्त तापमान – विमा संरक्षण कालावधी – 01 मार्च ते 15 मे.

आंबा फळपीक – समाविष्ट धोके – वेगाचा वारा – विमा संरक्षण कालावधी – 16 एप्रिल ते 15 मे.

आंबा फळपीक- समाविष्ट धोके- गारपीट (ऐच्छिक)-विमा संरक्षण कालावधी – 01 फेब्रुवारी ते 31 मे.

वरील हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास ही योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रात नोंदल्या गेलेल्या हवामान तपशिलानुसार विमा येाजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई अदा करण्यात येईल.

अधिक माहितीकरिता शेतकऱ्यांनी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन कोकण विभाग, ठाणे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.

000000000

संबंधित पोस्ट

फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाच्या पंढरपूर आवृत्ती 2025 मध्ये 5000 हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग;

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडामराठी भाषेचे जतन व संवर्धनाची चळवळ-सर्व शासकीय कार्यालयातून उभारावी

vishwatmaklokswamivarta

स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागाचा विकास होणार*  – सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले*

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातूनयंत्रणांनी शाश्वत ग्रामविकास साधावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे, अभियानाच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

vishwatmaklokswamivarta

जम्मू काश्मीरच्या: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील तीन संशयितांचे रेखाचित्र जारी…

शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या97 प्रकल्पग्रस्तांपैकी 43 प्रकल्पग्रस्तांना झाले भूखंडाचे वाटप,उर्वरित प्रकल्पग्रस्तांनी वारस नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रेजिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta