vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट*रिपब्लिकन पक्षाला किमान 5 जागा तरी मिळणार ..

*विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट*रिपब्लिकन पक्षाला किमान 5 जागा तरी मिळणार ..

 

राज्य प्रतिनिधी- रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी आज भाजप चे राज्यातील प्रमूख नेते उपमुख्यमंत्री ना.श्री देवेंद्र फडणवीस यांची आज सागर बंगल्यावर भेट घेऊन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाला काही जागा सोडण्याबाबत चर्चा केली.यावेळी राज्यभरातील चर्चेला दिलेल्या 10 ते12 जागांपैकी 5 ते 6 जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात याव्यात अशी आग्रही मागणी ना.रामदास आठवले यांनी उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली यावेळी झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला निश्चित जागा सोडणे आवश्यक असून त्याबाबत आज महायुती च्या तीन मोठ्या पक्षांसोबत च्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला दिले.

यावेळी ना. रामदास आठवलेंच्या नेतृत्त्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेल्या रिपब्लीकन पक्षाच्या शिष्टंडळात राष्ट्रिय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; राज्य युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे; एम एस नंदा; महेंद्र मानकर; हेमंत रणपिसे; प्रवीण मोरे; सचिन बनसोडे उपस्थित होते.

 

रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात केज जिल्हा बीड येथे पप्पू कागदे ; यवतमाळ मधील उमरखेड. विधानसभा मतदारसंघात महेंद्र मानकर; त्यानंतर धारावी ; चेंबूर; श्रीरामपूर ; पिंपरी; उत्तर नागपुर; देगळूर या 7 जागांवर रिपब्लिकन पक्षाने दावा केला असून यातील किमान 5 जागा रिपब्लिकन पक्षाला सुटतील अशी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चे नंतर रिपब्लिकन पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 

महायुती चे पुन्हा सरकार आल्यावर रिपब्लिकन पक्षाला एक कॅबिनेट मंत्री पद द्यावे; एक एम एल सी विधानपरिषद सदस्यत्व द्यावे; 3 महामंडळ चे अध्यक्ष पद; 3 उपाध्यक्षपदे द्यावीत; सर्व महामंडळाचे सदस्यत्व द्यावे तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगर पालिका निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाला जागा सोडाव्यात अशा विविध मागण्या रिपब्लिकन पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदन देऊन करण्यात आल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.

 

सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करावे; गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी 14 एप्रिल 1990 च्या मुदतीत वाढ करू

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यात : विठ्ठलाच्या कृपेनं राज्यात पुढील 4 दिवस सतत मुसळधार पाऊस,शेतीच्या कामांना वेग

सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ला निवडणूक आयोगाकडून ‘ढाल तलवार’ चिन्ह

vishwatmaklokswamivarta

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपोलीस दलाला बळकटी देणाऱ्या देखण्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..

पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयएनएस कदमतच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या फिरत्या ताफ्याचे ताफा संचलन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक जाहीर…