vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई-26 लाखाचा मुद्देमाल जप्त…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई-26 लाखाचा मुद्देमाल जप्त…

 

राज्य प्रतिनिधी

रायगड-विधानसभा निवडणूक सन 2024 च्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दि.15 ऑक्टोबर 2024 ते दि.22 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 107 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 88 आरोपीना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईमध्ये 37520 लि.दारु जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रुपये 26 लाख 61 हजार 212 आहे.

 

अवैध मद्याच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत इसमांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधीलकलम 93 अंतर्गत एकूण 61 प्रस्ताव विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले असून पैकी 14 कलम-93 अंतर्गत बंधपत्र करुन घेण्यात आलेले आहेत. तसेच संशयित आरोपी ज्ञातपत्यावर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 168 (फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम 149) नुसारसंबंधीताना गुन्हयापासून परावृत्त करण्याकरीता एकूण 470 कायदेशीर नोटीस देण्यात आल्या आहेत.

 

रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुक-2024 आचारसंहिता कालावधीत सर्व मद्य उत्पादक घटक, ठोक विक्री व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीवर प्रभावी नियत्रंण ठेवण्याकरीता अनुज्ञप्त्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सदरचे कंट्रोल रुम या कार्यालयात कार्यान्वित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुक-2024 आचारसंहिता कालावधीत या विभागाची 7 पथके तैनात असून पथकांस आंतरराज्यीय मद्य तस्करी होणार नाही तसेच बेकायदेशीर हातभट्टी दारु निर्मिती व विक्री केंद्र व वाहतूक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होणार नाही याकरीता रायगड जिल्ह्यात शेडूंग, ता.पनवेल, व चांदवे, ता.पोलादपूर येथे 2 तपासणी नाके उभारण्यात आलेले असून तेथे संशयितवाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे, हॉटेल, टपऱ्या यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत आहे.

 

विधानसभा निवडणूक 2024 मुक्त व निर्भयपणे पारपाडावी याकरीता विधानसभा मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनांस आल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉटस ॲप क्र. 8422001133 व टोल फ्रीक्र.18002339999 व अधीक्षक कार्यालय रायगड येथील दूरध्वनी क्रमांक 02141-228001 वर संपर्क साधण्यात

संबंधित पोस्ट

मुंबई-पुणे हायवे वर 3 ट्रकचा अपघात; एक कंटेनर 100 फूट दरीत कोसळला

vishwatmaklokswamivarta

एस.एस.बी. पूर्वतयारी मोफत प्रशिक्षणासाठी 10 डिसेंबरला मुलाखती …

vishwatmaklokswamivarta

शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससमाज कल्याण अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान..

महाराष्ट्रात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर जयंती साजरी करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची कामेगतीने पूर्ण करावीत- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन,पद्म भूषण पुरस्काराच्या औचित्याने माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, प्रख्यात गायक पंकज उधास यांना अभिवादन..

vishwatmaklokswamivarta