vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात  ३१ नामनिर्देशनपत्र दाखल पनवेल,अलिबाग,कर्जत,उरण,महाड,पेण आणि श्रीवर्धन मतदारसंघात ३४ अर्ज दाखल…

जिल्ह्यात  ३१ नामनिर्देशनपत्र दाखल पनवेल,अलिबाग,कर्जत,उरण,महाड,पेण आणि श्रीवर्धन मतदारसंघात ३४ अर्ज दाखल…

 

रायगड प्रतिनिधी- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास दि.२२ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात कर्जत, उरण आणि श्रीवर्धन मतदारसंघात ३१ उमेदवारांची ३४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे :-

१८८ – पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आज ७ उमेदवारांनी ९ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. श्री प्रशांत राम ठाकूर (भारतीय जनता पार्टी) २ अर्ज, श्री कांतीलाल हरिश्चंद्र कडू (अपक्ष), श्री कांतीलाल हरिश्चंद्र कडू (लोकमुद्रा जनहित पार्टी),श्रीमती लीना अर्जुन गरड (शिवसेना, उबाठा), श्री अरुण जगन्नाथ भगत (भारतीय जनता पार्टी),श्री पवन उत्तमराव काळे (भारतीय जन सम्राट पार्टी),श्री गजेंद्र कृष्णदास अहिरे (बहुजन समाज पार्टी),डॉ.वसंत उत्तम राठोड (डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन)

 

१८९ – कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये आज ६ उमेदवारांनी ७ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. श्री महेंद्र सदाशिव थोरवे (शिवसेना),श्रीमती नमिता सुधाकर घारे (अपक्ष), किरण खंडू ठाकरे (भारतीय जनता पार्टी), किरण खंडू ठाकरे (अपक्ष) ,नितीन नंदकुमार सावंत (शिवसेना, उबाठा),श्री श्रीराम बळीराम महाडिक (बहुजन समाज पार्टी),सुधाकर यादवराव घारे (अपक्ष)

 

१९० – उरण विधानसभा मतदार संघामध्ये आज ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. श्री सुनील मारुती गायकवाड (बहुजन समाज पार्टी),श्री मनोहर भोईर (शिवसेना, उबाठा),श्रीमती निलम मधुकर कडू (अपक्ष), श्री बाळकृष्ण धनाजी घरत (अपक्ष)

 

१९१ – पेण विधानसभा मतदार संघामध्ये आज ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. श्री रविंद्र दगडू पाटील (भारतीय जनता पार्टी) ,श्री देवेन मारुती कोळी (वंचित बहुजन आघाडी),श्री अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्या वतीने सूचक प्रतीक सदानंद म्हात्रे (शेकाप),श्री प्रसाद केळुराम भोईर (शिवसेना, उबाठा)

 

१९२ – अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये आज ३ उमेदवारांनी ३ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. श्री महेंद्र हरी दळवी (शिवसेना), कुमारी जुईली महेंद्र दळवी (अपक्ष),श्री मंदार एकनाथ गावंड (अपक्ष)

 

१९३ – श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये आज ३ उमेदवारांनी ३ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. श्री संतोष तानाजी पवार (अपक्ष),श्री राजेंद्र मधुकर ठाकूर (इंडियन नॅशनल काँग्रेस), श्री कृष्णा पांडुरंग कोबनाक (अपक्ष).

 

१९४ – महाड विधानसभा मतदार संघामध्ये आज ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे.

श्रीमती स्नेहल माणिक जगताप (शिवसेना, उबाठा),भरत मारुती गोगावले (शिवसेना) ,श्रीयश माणिक जगताप (शिवसेना, उबाठा),श्रीमती प्रज्ञा खांबे (अपक्ष)

 

जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरु असून दि.२९ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. या सर्व अर्जाची दि. ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येणार असून दि.४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. मतदान दि.२० नोव्हेंबरला होत असून दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

मध्यप्रदेशातील घटना : आदिवासी तरुणावर लघवी केल्याचे प्रकरण प्रवेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या पार्श्वभूमीवर-निवडणूक/नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न..

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वाहतूक शाखा यांच्याकडून राष्ट्रीय लोक अदालत जनजागृती व वाहतूक खटल्यातील प्रकरणांत तडजोडीबाबत माहितीसाठी सुरू होणार ‘हेल्पडेस्क’*

vishwatmaklokswamivarta

राज्यातील 12 कोटी जनतेने महाविकास आघाडी व महायुतीला पराभूत करून आरक्षणवादी आघाडीला सत्ता देण्याचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

पुरवणी मागण्यांचा निधी केंद्रपुरस्कृत विकास योजनांवरखर्च होणार असल्याने राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडेल- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तरआर्थिक शिस्तीचे पालन करीतच राज्याचा अर्थकारभार सुरु राज्यावरील कर्जाचा आणि तिजोरीवरील वित्तीय भार मर्यादेतच.

एक्साईड इंडस्ट्रीच्या कामगारांना कामावर परत घेण्याबाबत…व्यवस्थापनाने दहा दिवसात निर्णय घ्यावा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बबनसोडे