vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

३०० कोटी रुपयांच्या रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न अर्जुन खोतकर यांनी चालवला आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न आपण कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही अशी ग्वाही जालना विधानसभा मतदार संघातील इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कैलास गोरंटयाल

३०० कोटी रुपयांच्या रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न अर्जुन खोतकर यांनी चालवला आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न आपण कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही अशी ग्वाही जालना विधानसभा मतदार संघातील इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कैलास गोरंटयाल

 

जालना (प्रतिनीधी) समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जालना साखर कारखान्याच्या जमिनीच्या मोबदल्यापोटी मिळणार असलेल्या सुमारे ३०० कोटी रुपयांच्या रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न अर्जुन खोतकर यांनी चालवला आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न आपण कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही अशी ग्वाही जालना विधानसभा मतदार संघातील इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कैलास गोरंटयाल यांनी दिली.

जालना विधानसभा मतदार संघातील इंदेवाडी, सिंधी काळेगाव, वाघ्रूळ जहागीर आणि रामनगर येथे आयोजित प्रचार सभेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी खा.डॉ.कल्याण काळे, शिवसेनेचे (उबाठा पक्षाचे) जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, विजय चौधरी, मुरलीधर शेजुळ, शिवाजीराव शेजुळ, मुरलीधरराव थिटे, माणिकराव शिंदे, अब्दुल रउफ परसूवाले, राम सावंत, बबनराव खरात, कृष्णा पडूळ,संदीप खरात, डॉ.विशाल धानुरे, सौ. सुषमाताई खरात, गजानन खरात, दत्ता पाटील शिंदे, मनोहर उघडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना गोरंटयाल म्हणाले की, रामनगर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी जालना सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी आपल्या शेतजमिनी त्यावेळी दिल्या. सहकार महर्षी माजी खासदार बाळासाहेब पवार यांच्या आशीर्वादाने रामनगर येथे कारखाना उभारल्या गेला. या कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असतांनाच या सुरू असलेल्या कारखान्याची पुढे वाट लावण्यात आली. या कारखान्याच्या आणि शेअर्स होल्डर असलेल्या शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन कुणी गिळंकृत केली हे सर्वांना माहीत असल्याचे सांगून गोरंटयाल म्हणाले की, कारखान्याची जमीन गिळंकृत करणाऱ्या खोतकरांचा डोळा आता समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी मिळणाऱ्या ३०० कोटी रुपयांवर असल्याचा आरोप त्यांनी केला. जमिनीचा मिळणारा मोबदला खोतकर यांना मिळाला पाहिजे का ? असा प्रश्न उपस्थितांना विचारून हा सर्व मिळणारा पैसा हा कारखान्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना, पगार न मिळालेल्या कारखान्याच्या कामगारांना आणि भागधारकांना मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगून या प्रकरणी आपण न्यायालयात देखील गेलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी बांधव आणि कामगारांसाठी आपण सतत संघर्षाची भूमिका घेतली आहे. जनतेसाठी काम करावं लागत, तरच लोक निवडून देतात. या निवडणुकीत आपल्याला पुन्हा विधानसभेत पाठवा, उद्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार असून सरकार आल्यानंतर आपले प्रमोशन होणार असल्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले असल्याचे नमूद करत आपले प्रमोशन झाल्यानंतर मतदार संघातील जनतेला विकास काय असतो हे दाखवून देईल असा विश्वास गोरंटयाल यांनी शेवटी व्यक्त केला. तत्पूर्वी खा. डॉ. कल्याण काळे, भास्करराव अंबेकर, राजेंद्र राख आदींनी मविआचे उमेदवार कैलास गोरंटयाल यांना विजयी करण्याचे आवाहन आपल्या भाषणातून केले. उपरोक्त गावांमध्ये आयोजित प्रचार सभेस दिलीप मोरे, समाधान शेजुळ, संतोष जमधडे, बालाजी शिरसाठ, गणेश ढवळे, सर्जेराव वाघमारे, मच्छिंद्र ढगे, राम कुऱ्हाडे, गणेश खरात, गणेश तिडके, सुरेश कदम, एकनाथ कुटे, सोपान तिरुखे, माऊली इंगळे, नारायण वाढेकर, सुरेश वाढेकर, शामराव लांडगे, मल्हारी पठाडे, राजू वाघ, राम चव्हाण,गोपाल मोरे, राम शेजुळ, युवराज राठोड, विष्णू पडूळ, दामोधर सोनवणे, ज्ञानेश्वर डुकरे, अंजेभाऊ चव्हाण यांच्यासह त्या त्या गावातील हजारो महीला, पुरुष, युवक कार्यकर्त्यांची

संबंधित पोस्ट

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; योजनेंतर्गत सुविधा कर्जाचे 30 तर महिला समृद्धीचे 25 लाभ्यार्थ्यांची निवड

vishwatmaklokswamivarta

रस्ता सुरक्षा अभियान २०२५-सुरक्षितता बाळगण्यात आहे ‘हिरोगिरी’- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘वाचन कट्ट्या’ला भेट अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी स्वामी यांचे केले कौतुक

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 38 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवाई दलाच्या चिनूक विमानांनी हिमाचल प्रदेशातील चंबा इथल्या मणिमहेश तीर्थक्षेत्रातून अडकलेल्या यात्रेकरूंना यशस्वीरित्या बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta

आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी-संगठन मजबूत करावे – भास्कर (आबा) दानवे,जालना शहरातील संग्राम नगर येथे भाजयुमो चे शाखा उदघाटन

vishwatmaklokswamivarta