vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी विभागातील महिलांना भेटवस्तू देण्याचा आरोप शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेश खंदारे यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाची तक्रार दाखल

धारावी विभागातील महिलांना भेटवस्तू देण्याचा आरोप शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेश खंदारे यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाची तक्रार दाखल

 मुंबई प्रतिनिधी

उमेदवार भेटवस्तू देऊन ही आमिष दाखवत असल्याचा आरोप धारावी विधानसभा क्षेत्राचे  शिवसेनेचे उमेदवार राजेश खंदारे यांच्यावर करण्यात आलेला आहे याबाबत काँग्रेस पार्टीने निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे

धारावी विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे उमेदवार राजेश खंदारे यांच्याकडून मतदारांना भेट वस्तूंचे वाटप केले जात आहे. शुक्रवारी रात्रीही असाच प्रकार उघडीस आला असून उमेदवार राजेश खंदारे यांचे भाऊ प्रदिप खंदारे यांच्या मालकीच्या हॉलमध्ये वार्ड क्रमांक १८६ च्या शिंदे शिवसेनेच्या शाखा प्रमुख सुनिता कैलास सोनटक्के यांच्या उपस्थितीत महिलांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा आदर्श आचारसंहितेचा भंग असून याबाबतची रितसर तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली असून शिवसेना उमेदवार राजेश खंदारे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

 

संबंधित पोस्ट

पुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई महानगरपालिका एफ उत्तर यांच्या सहकार्याने सायन येथील प्रतीक्षा नगर परिसरात साफसफाई मोहीम

vishwatmaklokswamivarta

वीर शहीदाच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित न राहिल्यास त्याचा पुतळा तोडणार- लोकेन्द्र साहू..

रवी गिते यांची कोकण विभागीय माहिती उपसंचालकपदी पदोन्नती कोंकण विभागीय माहिती उपसंचालक पदाचा स्विकारला पदभार..

मंदिरातील वस्त्रसंहितेविषयी खोटा प्रचार करू नका;वस्त्रसंहिता महिलांसाठी नव्हे, तर सर्वांसाठीच! वकीलांसाठी इंग्रजाळलेला काळा ड्रेसकोड चालतो, तर मंदिरातील ड्रेसकोडविषयी आक्षेप का ? – ‘रणरागिणी’चा सवाल

vishwatmaklokswamivarta

लोकल अपघातानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार दिवा-CSMT जलद लोकल सुरू करण्याची रेल्वेकडे मागणी, गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर. “नवीन मार्गिका, १५ डब्यांच्या लोकल्स आणि जलद सेवा गरजेच्या!”