vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दि.30 नोव्हेंबर व 01 डिसेंबर रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन नागरिकांनी लाभ घ्यावा

दि.30 नोव्हेंबर व 01 डिसेंबर रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन नागरिकांनी लाभ घ्यावा

 

राज्य प्रतिनिधी प्रतिनिधी रायगड :-मा. उच्च न्यायालय, मुंबई द्वारे विधी सेवा प्राधिकरणाचे सहकार्य घेत दि.30 नोव्हेंबर  व 01 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या विशेष लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रायगड अलिबाग ए. एस. राजंदेकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोल शिंदे यांनी केले आहे.

न्यायालयातील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे आपसी सामंजस्यातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरिता लोक अदालत हे प्रभावी माध्यम म्हणून समोर आले आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून अनेक पक्षकारांनी आपली प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढली आहेत. लोक अदालतीमध्ये तडजोडीद्वारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रलंबित प्रकरणातील पक्षकार यांच्या सोबतच शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहे. तसेच लोक अदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आले आहे. लोक अदालतीचे यश लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने प्रलबित असलेले तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याकरीता विशेष लोक अदालतीचे आयोजन दि.30 नोव्हेंबर  व 01 डिसेंबर 2024 रोजी केले आहे. प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी असा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

“जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालय, मुंबई येथे प्रलंबित आहेत. त्यांच्याकरिता आपली प्रकरणे आपली समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरिता ही एक सुवर्ण संधी मुंबई उच्च न्यायालयाने उपलब्ध करून दिली आहे. त्या सुवर्ण संधीचा लाभ नागरिकांनी घ्यावा.

०००००००

संबंधित पोस्ट

मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती येथून थेट गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या आपल्या वेबसाईट पोर्टलला आपल्या सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा

मिरज शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण संस्थेतर्फे मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण

श्री गुरु नानक देव जी जयंती च्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा.. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती साजरी ..

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार असून बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार

पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पाजवळील शासकीय जमिनींवरआर्थिक केंद्र विकसित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा उत्तरवाहिनी रस्त्याच्या कामाचा आढावा

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा कॅनडावर तीव्र हल्ला; म्हणाले- ‘खलिस्तानी मुद्द्यावर त्यांच्या प्रतिक्रिया या व्होटबँकेच्या राजकारणाने चालतात…..

vishwatmaklokswamivarta