vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्या

यंदाचा चातुर्मास हा नेहमीच लक्षात राहण्यासारखा-साध्वींना संघातर्फे निरोप…

यंदाचा चातुर्मास हा नेहमीच लक्षात राहण्यासारखा-साध्वींना संघातर्फे निरोप…

 

राज्य प्रतिनिधी

अध्यात्मिक वार्ता -जालना : यंदाचा चातुर्मास हा नेहमीच लक्षात राहण्यासारखा आहे. विविध स्पर्धा, ट्रॉफीमुळे तर प्रभावना वाटण्यासाठी लागलेली चढाओढ आणि विशेष करुन जप, तप आणि विविध प्रकारच्या साधनेमुळे हा चातुर्मास प्रत्येकाच्या लक्षात राहील. आज संघातर्फे साध्वींसाठी खास निरोप संभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित श्रावक आणि श्राविकांनी आप-आपली मते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आभार नेहमीप्रमाणेच संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले.

सर्वात शेवटी बोलतांना डॉ. गादिया म्हणाले की, खरे तर या चातुर्मासामध्ये अनेकांचे योगदान राहिले आहे. खुर्च्या पुसणार्‍यांपासून ते साध्वींच्या गोचरीपर्यंत आणि संघाच्या कर्मचार्‍यांनी सुध्दा विशेष प्रयत्न केलेले आहेत. या सर्वांच्या योगदानामुळे हा चातुर्मास फलदायी ठरला, असे आपण मानतो. गज्जू काकडेंचा तर आवश्यक उल्लेख त्यांनी यावेळी केला. तर पुजा सकलेचा हिने साध्वींची सातत्याने काळजी घेतल्याबद्दल डॉ. गादिया यांनी तिचा स्वत:च्यावतीने तिला शाल अर्पण करुन र्‍हद्य सत्कार केला. याप्रसंगी साध्वी प. पू. सौम्यज्योतिजी म. सा. यांंनी आपल्या पहाडी आवाजात गीत सादर करुन उपस्थितांचे पारणे फेडले.  संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा; साध्वी अर्हतज्योतीजी म. सा; साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा; साध्वी हितसाधनाजी म. सा; प.पू.गुरुछायाजी म.सा; साध्वी सौम्यज्योतिजी म. सा.आदींना संघातर्फे निरोप देण्यात येणार आहे. तर यावेळी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. म्हणाल्या की, साधु- संतांचं जे काम असतं, तेच आपण केलं आहे. या पेक्षा काहीही वेगळं असं केलं नाही. आपल्या श्रावक- श्राविकांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून करुन घेता येईल तेवढी आराधना करुन घेण्याचा प्रयत्न केला. तर साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी म्हटले की, 99 पॉईट आम्ही तुमच्याकडून साधना करुन घेतली असली तरी त्याला तुमच्याकडून प्रतिसाद नसता मिळाला तर ते कामही शंभर टक्के पूर्ण झाले नसते. मात्र आपली साथ मिळत गेल्याने हे शक्य झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्‍याची मोठी उपस्थिती होती.(छाया : कैलास बैरागी)

संबंधित पोस्ट

राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार..

राज्यात पुन्हा एकदा नागपूरमध्ये एका कारने पाच जणांना उडवल्याची धक्कादायक घटना: अल्पवयीन मुलांना अटक

सील आश्रम ‘ पनवेल ही संस्था रस्त्यावर / फुटपाथ वर राहणारे बेवारस आजारी जखमी वेडसर मूकबधिर यांना सेवा देणाऱ्या सदर संस्थे च्या रुग्णवाहिका यांचे उद्घाटन ठाणे पोलीस आयुक्त अशोक डांबरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले

पोलीस भरती परीक्षेतील मोठा गैरव्यवहार उघड होण्याची येण्याची शक्यता प्रीतिश देशमुखच्या घरी सापडले कागदपत्र आरोग्य, म्हाडा, टीईटीनंतर धक्कादायक गोष्टी समोर संशयाच्या भोवऱ्यात..

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सामाजिक जाणीव जागृती

vishwatmaklokswamivarta

सर्वंकष धोरणाअंतर्गत बार्टी मार्फत यूपीएससी, एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू