vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला शीख समाजाचा जाहिर पाठिंबा – संत ज्ञानी हरनाम सिंह खालसा….

 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला शीख समाजाचा जाहिर पाठिंबा – संत ज्ञानी हरनाम सिंह खालसा….

 

[ विशेष प्रतिनिधी सुरेश गायकवाड]-

मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्यातील शीख समाज महायुतीला येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जाहिर पाठिंबा दिला असल्याची माहिती शीख समाज महाराष्ट्र राज्याचे संत ज्ञानी हरनाम सिंह खालसा यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली . त्यावेळेस त्यांच्यासमवेत वाल्मिकी सिंह, जसपाल सिंह सिद्धू आदी मान्यवर उपस्थित होते .

      त्यांनी सांगितले की , सरकारने 2.5 वर्षामध्ये गुरु नानक लेवा संगत, सिख , पंजाबी, लुभाना, सिकलीगर , सिंधी आणि बंजारा समाज यांच्या सामाजिक व आर्थिक उत्थानासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे . इतकेच नव्हे तर शीख समाज आणि गुरु नानक लेवा संगत यांच्याकरिता प्रथमतः अल्पसंख्यांक आयोगामध्ये प्रतिनिधित्व बहाल केले आहे . याशिवाय शीख समाजासाठी एक समिती स्थापन केली आहे . हेच कमी काय तर शीख समाजातील सदस्यासाठी अल्पसंख्यांक विकास आयोगासाठी नियुक्ती केली आहे . तसेच पंजाबी साहित्य अकादमीची स्थापना केली आहे . अर्थात सरकारचे धोरण हे समाजाच्या उन्नतीसाठी , विकासासाठी , उत्कर्षासाठी उल्लेखनीय आहे .

 त्यामुळेच गुरु नानक नाम लेवा संगत, सिख , हिंदू , पंजाबी, सिंधी, सिकलिगर , बंजारा, आणि लुभाना समाज सरकारच्या धोरणावर अत्यंत खूष आणि समाधानी आहे .

 त्यामुळेच शीख समाज आपल्या सर्व बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, येत्या २० नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महायुतीला विजयी करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .

संबंधित पोस्ट

५४२ मोटार अपघात दावे प्रकरणात ४ कोटी ३० लाखांची,नुकसान भरपाई; पक्षकारांना संपर्क साधण्याचे आवाहन

राष्ट्रीय लोकन्यायालयात तडजोडीने 1 हजार 104 प्रकरणे निकाली 

vishwatmaklokswamivarta

आपत्तीग्रस्तांसाठी केंद्र सरकार ने महाराष्ट्राला आर्थिक मदत जाहीर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन नव संशोधनासाठी उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला स्वायतत्ता देणे ही काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

प्रयागराज येथे महाकुंभच्या शेवटच्या महाशिवरात्री दिवशी हवाई दलाचे जोरदार शक्ती प्रदर्शन; लढाऊ विमानांच्या एअर शोचे मनमोहक दृश्य…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यात 3 हजार 467 प्रकरणे निकाली