vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

५४२ मोटार अपघात दावे प्रकरणात ४ कोटी ३० लाखांची,नुकसान भरपाई; पक्षकारांना संपर्क साधण्याचे आवाहन

५४२ मोटार अपघात दावे प्रकरणात ४ कोटी ३० लाखांची,नुकसान भरपाई; पक्षकारांना संपर्क साधण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्हा न्यायालयात जुन्या व निकाली निघालेल्या ५४२ मोटार वाहन अपघात दावे प्रकरणातील ४ कोटी ३० लाख ६२ हजार ८१५ रुपये नुकसान भरपाईची अवितरीत रक्कम संबंधित पक्षकारांना देण्यात येणार आहे. या सर्व पक्षकारांची यादी www.aurangabad.dcourts.gov.in या संकेतस्थळावर व जिल्हा न्यायालयाच्या सुचना फलकावर आहे. संबंधित पक्षकारांनी जिल्हा न्यायालयात संपर्क साधून आपली रक्कम प्राप्त करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस यांनी केले आहे.

  सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशान्वये जिल्ह्यातील मोटार अपघात दावे प्रक्ररणातील अवितरीत रक्कम संबंधिताना प्रदान करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण ५४२ प्रकरणात ४ कोटी ३० लाख ६२ हजार ८१५ रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम अवितरीत आहे. अशा ५४२ लोकांची यादी ही www.aurangabad.dcourts.gov.in या संकेतस्थळावर व जिल्हा न्यायालयाच्या सुचना फलकावर आहे. लोकांनी ही यादी पहावी. त्यानुसार येत्या आठ दिवसांच्या आत संबंधितांनी आपल्या रकमा सहा. अधीक्षक, वित्त व लेखा विभाग, ३ रा मजला, जिल्हा सत्र न्यायालय, छत्रपती संभाजीनगर येथे समक्ष उपस्थित राहून रक्कम तात्काळ घेऊन जावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सहा. अधीक्षक लेखा विभाग ०२४०-२३५३१५८, प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय ०२४०-२३३४८३९, अधीक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण -८५९१९०३६२० या क्रमांकावर संपर्क साधावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

     पंतप्रधान इंटर्नशिप योजना’, लाभ घेण्याचे आवाहन                                        

महाराष्ट्र शासन जिंदाबाद ! जिल्हा प्रशासनाच्या तत्काळ मदतीवर प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाण्यात अडकलेल्या दोन बस सुखरूप बाहेर; प्रवाशांचे जिल्हा प्रशासनाचे आभार

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी

vishwatmaklokswamivarta

सातारा शहरात माय भारत सरदार वल्लभभाई पटेल यूनिटी मार्चद्वारे दुमदुमला राष्ट्रीय एकतेचा जयघोष**देश एकसंध ठेवण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

जालना शहर महापालिका श्री गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आयुक्त यांचे हस्ते स्थापना.

शिवनगर येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागरक्तदान हेच जीवनदानचा संदेश; सेवा व समर्पणातून मानवतेचा जागर