vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

महाविकास आघाडीच्या 157 जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत मीडियामध्ये सादर करण्यात आलेल्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला शरद पवार यांनी दिला

 महाविकास आघाडीच्या 157 जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत मीडियामध्ये सादर करण्यात आलेल्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला शरद पवार यांनी दिला

 

राज्य प्रतिनिधी- महाविकास आघाडीकडून सातत्याने विजयाचा दावा केला जात आहे. एक्झिट पोलमध्ये सुद्धा राज्यातील सत्तासमीकरणांवरून संभ्रमावस्था असल्याने नेमकी कोण बाजी मारणार? याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या उमेदवारांची ऑनलाईन मीटिंग घेतली. या बैठकीमध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच उद्या(23 नोव्हेंबर 2024) निकाल लागणार आहेत. या निकालापूर्वी राज्यात मुख्यमंत्रीपदाची लढाई अधिक तीव्र झाली आहे. सत्ताधारी महायुतीपासून ते महाविकास आघाडीपर्यंत…मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदारांची नावे पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत विशेषतः महाविकास आघाडी सतर्क होताना दिसत आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीचे (शप) अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांसह ऑनलाइन बैठक घेतली.

महाविकास आघाडीच्या,ऑनलाईन झालेल्या या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या 157 जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत मीडियामध्ये सादर करण्यात आलेल्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. दरम्यान, शरद पवार यांनी मतमोजणी संदर्भात सुद्धा दिला. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडून जाऊ नका, जिंकल्यानंतर प्रमाणपत्र घेऊनच थेट मुंबईला येण्याच्या सूचना सुद्धा शरद पवार यांनी या ऑनलाइन बैठकीमध्ये आपल्या उमेदवारांना केल्या आहेत. मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून ग्रामीण भागात येणाऱ्या आमदारांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षाकडून हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या उमेदवारांना उद्याची रणनीती संदर्भात ऑनलाइन बैठक करून मार्गदर्शन केले

महाविकास आघाडीकडून एक्झिट पोल बाजूला सारा सरकार स्थापन करणे साठी आपली रणनीती आखली आहे या संदर्भात जे अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे त्यांना पुन्हा कोणी सुरू आहे समविचारी पक्षांना एकत्र मिळून सरकार स्थापन करण्याचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचेही सूत्रांकडून कळत आहे

संबंधित पोस्ट

क्यूआर कोड प्रणालीच्या माध्यमातून-मतदारांना ‍मिळणार मतदानकेंद्राची माहिती-जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

vishwatmaklokswamivarta

घड्याळाला मतदान करण्याच्या आव्हान आणि ज्यांना पदे दिली त्यांच्यावर मी हक्क गाजविणार ; अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण दि.१६ पासून

बीड जिल्ह्याचे सरपंच: संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी लघुटंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

-: दुःखद बातमी :- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे काळाच्या पडद्याआड*