vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम व पल्स पोलिओ मोहिम प्रभावीपणे राबवा – जिल्हास्तरीय टास्क फोर्समध्ये आवाहन-साडेचार लाख मुलांना मिळणार जंतनाशक गोळ्या

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम व पल्स पोलिओ मोहिम प्रभावीपणे राबवा – जिल्हास्तरीय टास्क फोर्समध्ये आवाहन-साडेचार लाख मुलांना मिळणार जंतनाशक गोळ्या

 

            ठाणे, प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यात ४ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच 8 डिसेंबर रोजी उपराष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या दोन्ही मोहिमांची तयारी पूर्ण झाली असून आरोग्य यंत्रणांनी दोन्ही मोहिमा प्रभावीपणे राबवावी व एकही बालक यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन आज जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत करण्यात आले.

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम व उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम तसेच नियमित लसीकरण मोहिमेच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांच्यासह जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमा यशस्वीपणे राबविण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक पात्र विद्यार्थ्यांला जंतनाशकाची गोळी देण्यात यावी. तसेच यासाठी सर्व शासकीय शाळा, खासगी शाळांमध्ये योग्य ती खबदारी घेण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांनाही जंतनाशक गोळ्या तसेच पोलिओ डोस मिळेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या विट भट्टी परिसरातील नागरिकांच्या मुलांनाही जंतनाशक गोळ्या व पोलिओ डोस देण्यात यावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.   मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ ते १९ वर्षे वयोगटातील चार लाख ५६ हजार ३५२ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला – मुलींमध्ये अॅनेमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे इत्यादी आजारांचा धोका उद्भवतो. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी जंतनाशकाची गोळी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.

महिला व बालविकास विभाग, पाणी पुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग तसेच शिक्षण विभागाच्या एकत्रित सहभागाने व समन्वयाने संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात हा कार्यक्रम शाळा व अंगणवाड्यामध्ये ४ डिसेंबर २०२४ व जंतनाशक मोहिमेच्या दिवशी जी मुले उपस्थित राहणार नाहीत त्यांना १० डिसेंबर २०२४ रोजी (मॉप अप दिवशी) गोळ्या देण्यात येणार आहेत.   या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा तीन स्तरावर प्रशिक्षण दिले असून सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नोडल शिक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा कारागृहात क्षयरोग दुरीकरण मोहिम; बंद्यांची तपासणी व जनजागृती कार्यक्रम

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क* *नागरिकांना शांतता राखण्याचे तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन*

भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेश कार्यालयात जल्लोषात स्वागत**मुंबई भाजपा अध्यक्ष मा. आशिष शेलार यांचा सत्कार*

महालक्ष्मी साजसजावट स्पर्धा उत्साहात स्लग- दोन हजार स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ कार्यक्रम जनजागृती उपक्रमाच्या अंमलबजावणीचा लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घेतला आढावा* लातूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये मंगळावर, बुधवारी प्रभात फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

टीआरटीआयच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते प्रकाशन