vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हा कारागृहात क्षयरोग दुरीकरण मोहिम; बंद्यांची तपासणी व जनजागृती कार्यक्रम

जिल्हा कारागृहात क्षयरोग दुरीकरण मोहिम; बंद्यांची तपासणी व जनजागृती कार्यक्रम

बुलडाणा, प्रतिनिधी: जिल्हा कारागृह, बुलढाणा आणि जिल्हा क्षयरोग कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंद्यांची तपासणी करून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत बंद्यांमध्ये क्षयरोगासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संदीप भुतेकर हे होते. जिल्हा क्षयरोग अधिकारी वर्षा गुट्टे यांनी बंद्यांना क्षयरोगासंबंधी मार्गदर्शन केले. शिबिरात बंद्यांची आधुनिक एक्स-रे मशिनद्वारे तपासणी करण्यात आली. तसेच क्षयरोगाच्या संशयित रुग्णांचे थुंकीचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले. या तपासणीतून कारागृहातील आरोग्यस्थितीवर लक्ष ठेवण्याबरोबरच क्षयरोगाचे लवकर निदान करून उपचार शक्य होणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी मेघा बाहेकर, तुरुंगाधिकारी उमेश नाईक तसेच जिल्हा क्षयरोग कार्यालयातील डॉ. शिवदास सरोदे, सिध्देश्वर सोळंकी, राजेंद्र सुरडकर, मुकेश घेंगे, राजेंद्र सरोदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहिमेची प्रभावी सुरुवात करण्यात आली असून, बंद्यांच्या आरोग्य रक्षणाच्या दृष्टिकोनातून ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम — दि. १२ ऑक्टोबर २०२५“दोन थेंब आयुष्याचे – प्रत्येक बालकासाठी सुरक्षित भविष्याचे”..

कुष्ठरुग्ण शोध अभियान; जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न-कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन उपचार करा- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गीते

vishwatmaklokswamivarta

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी· ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta

थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ बाबत आयोजित बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंग नायक तसेच मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी 

नव्या वर्षाच्या सुरुवातीला HMPV व्हायरसचं चीनमध्ये थैमान घातल असून या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्रातील आरोग्य विभाग सज्ज झाल्याची माहिती वायरस ची भारतात एन्ट्री; बंगळुरुतील 3 आणि 8 महिन्यांच्या दोन चिमुकलींना लागण…

जीबीएस’ आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज नागरिकांनी घाबरून जावू नये –

vishwatmaklokswamivarta