vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

भाजपा विधिमंडळ नेते आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विटर वर काय म्हणतात ते पहा!

भाजपा आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विटर वर काय म्हणतात ते पहा!

महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत…🙏जबाबदारीची जाणीव करून देणारा जनादेश!

राज्य प्रतिनिधी -भाजपा विधिमंडळ गटनेतेपदाच्या बैठकीसाठी विधान भवन, मुंबई येथे मा. केंद्रीय मंत्री श्रीमती निर्मला सीतरमणजी, ज्येष्ठ नेते मा. विजयभाई रूपाणीजी आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेजी यांच्यासमवेत उपस्थित होतो. या बैठकीमध्ये भाजपा विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने माझी निवड केल्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले व उपस्थित भाजपा आमदारांना संबोधित केले.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वात देशात विजयाची मालिका हरियाणापासून पुन्हा सुरू झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक म्हणजे एक हैं तो सेफ हैं आणि मोदी हैं तो मुमकिन है…असाच संदेश देणारी निवडणूक आहे. महाराष्ट्राने दिलेल्या जनमतासाठी साष्टांग दंडवत!

संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300वे जयंती वर्ष, भगवान बिरसा मुंडा यांचे 125वे जयंतीवर्ष, श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयीजी यांचे 100 वे जयंती वर्ष अशा अतिशय महत्त्वाच्या वर्षात आपले सरकार स्थापन होत आहे. ही सर्वार्थाने ऐतिहासिक आणि अभिमानाची बाब आहे. जबाबदारीची जाणीव करुन देणारा हा जनादेश आहे. त्याचा सन्मान राखण्याचे काम करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.

महायुती सरकारने सुरु केलेल्या योजना तसेच दिलेली आश्वासने पूर्ण करणे हीच आपली प्राथमिकता आहे तसेच महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी कार्यरत राहणार असा शब्द यावेळी दिला.

2019 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल हिसकावून घेत बेईमानी करण्यात आली. सुरुवातीची अडीच वर्षे त्रास देण्यात आला, मात्र एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही याचा अभिमान आहे. बूथ कार्यकर्ता, वॉर्ड अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या नेत्याला तीन वेळा सर्वोच्च पदावर बसण्याची संधी दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री मा. जे.पी. नड्डाजी तसेच आमचे नेते व मार्गदर्शक केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा. अमितभाई शहा यांचे आभार मानले.

पुढची वाट ही संघर्षाची आहे, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी एकदिलाने काम करू असा निर्धार यावेळी सर्व आमदारांच्या साक्षीने व्यक्त केला.यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. चंद्रकांतदादा पाटील, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार आणि सर्व भाजपा आमदार उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

लेख-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली…त्यातून महिला स्वयंपूर्ण झाली

vishwatmaklokswamivarta

जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी गतीने करावी- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील दुर्घटना : ‘बीकेसी’मधील निर्माणाधीन पूल कोसळला; 13 मजूर जखमी,पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली

vishwatmaklokswamivarta

भारताच्या डिजिटल कौशल्य मोहिमेला गती देण्यासाठी “बढना है तो यहाँ जुडना है” या देशव्यापी मोहिमेचा, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी ‘एस आय डी एच’ या कौशल्य भारत डिजिटल केंद्राच्या माध्यमातून केला शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

स्विझरलँड येथील दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी 1 लाख 37 हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा;परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयशैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन