vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी घेतलाजिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी घेतलाजिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

 

जालना, प्रतिनिधी) : सन 2024-25 अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध शासकीय विभागानी योजनाकरीता केलेल्या खर्चाची माहिती घेतली. जिल्हा वार्षिक योजनेतून केली जाणारी कामे वेळेत पुर्ण करुन उपलब्ध निधी खर्च करण्याचे निर्देश त्यांनी सर्व विभागप्रमुखांना यावेळी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सूर्यवंशी यांच्यासह सर्व विभागप्रमुखांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी सन 2024-25 मधील कामांची स्थिती जाणून घेत, झालेल्या खर्चाची माहिती घेतली. तसेच अपुर्ण कामांची देखील स्थिती जाणून घेतली. प्रलंबित कामे लवकर पुर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या आर्थिक वर्षात विभागांना मंजूर निधी, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता तसेच खर्च व कामांची प्रगती यांचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला. सर्व विभागांनी मंजूर निधी आर्थिक वर्षात खर्च करणे आवश्यक आहे. ज्या विभागांच्या प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे, त्यांनी त्या तातडीने प्राप्त करून घ्याव्यात. निधी वेळेत खर्च करण्याची जबाबदारी संबंधीत विभागांची असून निधी अखर्चीक राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. योजनेतून कामे करत असतांना ती वेळेत होण्यासोबतच गुणवत्तापुर्ण होतील याची दक्षता घ्यावी, असे ही यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी सांगितले.

****

संबंधित पोस्ट

संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार

जालना शहरातील सर्व नागरिकांना सूचना- जालना महानगरपालिका

वंजारी समाज भवनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही-अर्जुनराव खोतकर..

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शांत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात  – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील * कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज *प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर!*_*मणिपुरी थांग-ता, शिवकालीन युद्धतंत्र व अफजलखान वधाचे थरारक सजीव प्रात्यक्षिक!*

vishwatmaklokswamivarta