देव्हारी शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय कागदपत्रे-आता जिल्हा परिषद शाळा वरवंड येथे मिळणार…
बुलढाणा, प्रतिनिधी : पंचायत समिती बुलढाणा अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा देव्हारी ही शाळा विस्थापित झाल्यामुळे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व दस्तऐवज, शाळा दुय्यम प्रत व इतर सर्व अभिलेखे हे नजिकची शाळा जि.प. मराठी उच्च मराठी शाळा वरवंड येथे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. विद्यार्थी व पालकानी शाळेशी संबंधित कामासाठी मुख्याध्यापक जिल्हा परिषद मराठी उच्च शाळा वरवंड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी केले आहे. 00000000