जालना (प्रतिनिधी) ः रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 14 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती वारी उत्सव सोहळा कार्यक्रम तसेच समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा दि. 16 व 17 डिसेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजता श्रीक्षेत्र माऊली माहेर सिमुरगव्हान येथे संस्थांच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन उपपीठ मराठवाडाच्या वतीने करण्यात आले आहे
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रम, वैद्यकीय उपक्रम, आर्थिक दृष्टीने दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिर आयोजित केली जातात. दि. 14 रोजी श्री दत्त जयंती वारी उत्सवात संस्थांच्या शैक्षणिक उपक्रम अंतर्गत आदिवासी आश्रम शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ब्लँकेट, शालेय दप्तर, वह्या, कंपास, वाटप केले जाणार आहे. संस्थांच्या ब्लड इन नीड उपक्रमा अंतर्गत ज्या रुग्णांना रक्ताची गरज भासते त्या रुग्णांना त्या हॉस्पिटल येथे जाऊन आजपर्यंत 20 हजार रुग्णांना रक्त देऊन प्राण वाचवण्यात आले आहे. तसेच संस्थांनचा मरणोत्तर देहदान हा उपक्रम जनसामान्यांमध्ये अत्यंत प्रभावीपणे यशस्वी होत आहे. सप्टेंबर 2016 ते डिसेंबर 2024 च्या कालावधीत 68 मरणोत्तर देहदान समाजाच्या सेवेसाठी शासकीय मेडिकल कॉलेजला सुपुर्द करण्यात आले आहेत. महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी राज्यातील 6 राष्ट्रीय महामार्गावर 53 रुग्णवाहिका विनामूल्य सेवा करत असून आतापर्यंत 25, 400 अधिक जखमीचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. दि. 14 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्त तसेच 16 व 17 डिसेंबर 2024 या दिवशी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचे अध्यात्मिक अमृततुल्य प्रवचन होणार आहे. सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.