बदनापूर: तालुक्यातील माळीवाडा येथील अनुश्री सुनील भगत हिने भारतातील प्रतिष्ठेची होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत यश…
राज्य प्रतिनिधी -बदनापूर: तालुक्यातील माळीवाडा येथील अनुश्री सुनील भगत हिने भारतातील प्रतिष्ठेची मानली जाणारी होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत यश मिळवले,त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कै. दादासाहेब चव्हाण पाटील इंग्लिश स्कूल आसेगाव या शाळेत इयत्ता नववी वर्गात शिकणार्या अनुश्री सुनील भगत हिने भारतात नावाजलेली होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सहभाग घेतला. आहे
या स्पर्धेत मुंबई शिक्षक संघटनेतर्फे सदरील स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धेतून विज्ञान विषयातील गुणवत्ता तपासण्यात येते. या स्पर्धेत माळीवाडा सारख्या ग्रामीण भागात असलेल्या अनुश्री भगत हिने सहभाग नोंदवत घवघवीत यश मिळवले. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत यशस्वी झाल्याबद्दल तिचे शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यासह अमृत तारो, चंद्रकांत भगत,अनिल भगत, अमोल तुपे, गणेश जाधव आदीनी अभिनंदन केले.००००००००