आताची मोठी बातमी- अखेर आज महाराष्ट्र राज्य मंडळाचे खाते वाटप जाहीर ….
मुंबई प्रतिनिधी- आज अखेर मंत्रिमंडळ खाते वाटपाची प्रतीक्षा संपली महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे राज्यपालांच्या हस्तक्षराने पत्रक जाहीर केले आहे कोणाला कुठले खाते याबाबतची संपूर्ण माहिती भारतीय जनता पार्टी मंत्र्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री मंत्र्यांची तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंत्र्यांची आणि खाते वाटपासह संपूर्ण माहिती खालील प्रकारे
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा खातेवाटप,आज हिवाळी अधिवेशही शेवटच्या दिवशी अखेर आज राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं असणार आहे, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातं असणार आहे.कोणाला मिळालं कोणतं खातं?
देवेंद्र फडणवीस : गृहखातं
एकनाथ शिंदे : नगरविकास आणि गृहनिर्माण
अजित पवार : अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क
चंद्रशेखर बावनकुळे : महसूल
राधाकृष्ण विखे पाटील : जलसंधारण
हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटील : उच्च तंत्र शिक्षण
गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा
धनंजय मुंडे : अन्न व नागरी पुरवठा
दादाजी भुसे : शालेय शिक्षण
गणेश नाईक : वनखातं
संजय राठोड : माती व पाणी परीक्षण खात
मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास
उदय सामंत : उद्योग व मराठी भाषा
जयकुमार रावल : विपणन
पंकजा मुंडे : पशुसंवर्धन आणि पर्यावरण
अतुल सावे : ओबीसी विकास, दुग्धविकास
अशोक उईके : आदिवासी विकास
शंभूराज देसाई : पर्यटन व खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
आशिष शेलार : माहिती व तंत्रज्ञान
दत्तात्रय भरणे : क्रीडा व अल्पसंख्याक विकास
अदिती तटकरे : महिला व बालविकास
शिवेंद्रराजे भोसले : सार्वजनिक बांधकाम
माणिकराव कोकाटे : कृषी
नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन
जयकुमार गोरे : ग्रामविकास आणि पंचायत राज
संजय शिरसाट : सामाजिक न्याय
भरत गोगावले : रोजगार हमी व फलोत्पादन
नितेश राणे : मत्स्य आणि बंदरे
प्रताप सरनाईक : वाहतूक
बाबासाहेब पाटील : सहकार
मकरंद पाटील : मदत व पुनर्वसन
प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण,राज्यमंत्री, कोणाकडे कोणतं खातं?
माधुरी मिसाळ : सामाजिक न्याय,अल्पसंख्याक विकास वैद्यकीय शिक्षण
आशिष जयस्वाल : अर्थ आणि नियोजन आणि विधी व न्याय
इंद्रनील नाईक : उच्च आणि तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास
मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण
योगेश कदम : गृह राज्य शहर
पंकज भोयर : गृह निर्माण