vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जी. डी. सी अँड ए परीक्षा फेरगुण’मोजणीसाठी,ऑनलाईन अर्जासाठी 5 जानेवारीची मुदत…

जी. डी. सी अँड ए परीक्षा फेरगुण’मोजणीसाठी,ऑनलाईन अर्जासाठी 5 जानेवारीची मुदत…

 

सांगली, प्रतिनिधी)

: जी. डी. सी अँड ए परीक्षा मे 2024 चा निकाल घोषित झाला असून, हा निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परीक्षार्थींना लॉग इन व पासवर्ड वापरून पाहता येईल. तसेच पीडीएफ फॉरमॅटमध्ये https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महत्त्वाचे दुवे मधील जी. डी. सी. अँड ए. मंडळ येथे पाहावयास उपलब्ध असल्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली तथा केंद्र प्रमुख, चीफ कंडक्डर, सांगली केंद्र यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, फेरगुण मोजणी करण्यासाठी परीक्षार्थींना दि. 5 जानेवारी 2025 पर्यंत https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परीक्षार्थींना लॉग इन व पासवर्ड वापर करून अर्ज करता येईल. फेरगुण मोजणी करण्यासाठी पीरक्षार्थींनी फेरगुणमोजणी शुल्क भारतीय स्टेट बँक (एसबीआय) या बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी फी रू. 75 अधिक बँक चार्जेस याप्रमाणे चलनाद्वारे भरावे. बँकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करून घेण्याची मुदत दि. 5 जानेवारी 2025 (रात्री 22.30) पर्यंत राहील. सदर चलन बँकेत दि. 8 जानेवारी 2025 पर्यंत (बँकेच्या कामकाजाच्या वेळेत) भरणा करावे. विहित तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

रामदेव बाबा यांची मोठी घोषणा; पतंजली ग्रुप च्या 4 कंपन्यांचे आयपीओ येणार

vishwatmaklokswamivarta

पुढील 10 तास राज्यात अतिमुसळधार पाऊस; या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान उद्योग संस्थेच्या संचालकांची आजपासून दोन दिवसीय सभा

जिल्हा रुग्णालयात अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न; अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याचा संदेश…

vishwatmaklokswamivarta

जागर स्त्री शक्तीचा जिल्हा प्रदर्शनाला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-बचतगटांच्या उत्पादनांना मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातून निघताच कार्यकर्त्यांमध्ये विवाद ,सभा रद्द