सहकार से समृध्दी कार्यक्रमास विकास सेवा संस्थांचे पदाधिकारी,सचिव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन*
सातारा प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाकडून नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “सहकार से समृध्दी” कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.सदरील कार्यक्रमाचे व्हीसी. द्वारे २५ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता सातारा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक साताराचे सभागृहामध्ये प्रक्षेपीत करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास जिल्हातील विकास सेवा संस्थांचे पदाधिकारी,सचिव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक, संजयकुमार सुद्रिक यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत बहुउद्देशीय प्राथमिक सहकारी संस्था, दूग्ध व्यवसाय व मत्सपालन सहकारी संस्थांच्या स्थापन करणे व सद्या कार्यरत असलेल्या विकास संस्थामध्ये ग्रामपंचायत व गावांना समाविष्ट करण्याची योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेतंर्गत स्थापन झालेल्या १० हजार प्राथमिक सहकारी संस्थापैकी ६ हजार संस्था दूध व्यवसायाशी निगडीत आहेत. अशी महत्वपूर्व उपलब्धी साजरी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाकडून २५ डिसेंबर रोजी न्यु दिल्ली येथे कार्यक्रम आयोजीत करण्यात येत असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
सदरील कार्यक्रमासाठी जिल्हातील लोकप्रतिनिधी, जिल्हा सहकार समिती DCDC समिती सदस्य तसेच सदरील समितील मदत करणारी JWC संयुक्त कार्यकारी समिती सदस्य,यांना निमंत्रीत केले असून जिल्हातील विकास सेवा संस्थांचे पदाधिकारी, सचिव तसेच सहकार खातेचे अधिकारी कर्मचारी यांना उपस्थित रहणेसाठी जिल्हा उपनिबंधक, संजयकुमार सुद्रिक यांनी आवाहन केले आहे.
सदर कार्यक्रमात ‘सहकार से समृध्दी’ या केंद्र शासनाचे कार्यक्रमातर्गत सातारा जिल्हात झालेल्या कामाची माहीती दिली जानार असून यशस्वी झालेल्या संस्थांचे यशोगाथा दाखविणेत येणार आहे.
कार्यक्रम दुपारी 1.00 वाजले पासून सातारा जिल्हा सहकारी बँकेचे यशवंतराव चव्हाण सभागृह सातारा येथे होणार असून सदरील कार्यक्रमास उपस्थित रहणेसाठी जिल्हा उपनिबंधक, संजयकुमार सुद्रिक यांनी आवाहन केले आहे.