vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबर-२०२४ पर्यंत हयात दाखले सादर करावे

निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबर-२०२४ पर्यंत हयात दाखले सादर करावे

 

रायगड प्रतिनिधी: शासनाच्या ज्या निवृत्तीवेतनधारकांना रायगड जिल्हा कोषागाराकडून निवृत्तीवेतन प्रदान केले जाते अशा सर्व निवृत्तीवेतनधारकांनी दि.१ ते दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी हयात असल्याबाबतचे हयात प्रमाणपत्र” (Life Certificate) या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन रायगड जिल्हा कोषागार अधिकारी रायगड-अलिबाग श्री. देवीदास टोंगे यांनी केले आहे.

निवृत्तीवेतनधारकांचे हयात प्रमाणपत्र विहित मुदतीत कोषागारात प्राप्त झाल्याशिवाय पुढील निवृत्तीवेतन प्रदान केले जाऊ शकत नाही. बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकांनी कोषागार कार्यालयाकडून संबंधित बँकेकडे पाठविण्यात आलेल्या घोषणापत्रावर स्वतः हयात असल्याबाबत बँक व्यवस्थापक यांच्या समक्ष दिनांकित स्वाक्षरी करावी. पुनर्नियुक्त/पुनर्विवाह केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतन/निवृत्तीवेतनधारकांकरिता नियमित नमुना वापरावा. मनिऑर्डरद्वारे निवृतीवेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकांचे हयात दाखल्यांचे नमुने या कोषागार कार्यालयाकडून संबंधितांच्या पत्त्यावर पाठविण्यात आलेले आहेत. त्यांनी स्वतःचे हयात दाखले स्वाक्षरीसह पूर्ण करुन कोषागार कार्यालयाकडे परस्पर पाठविण्याची व्यवस्था करावी.

तसेच अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा कोषागार कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा कोषागार अधिकारी श्री. देवीदास टोंगे यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

द्राक्ष बागाईतदार संघाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या ६५ व्या वार्षिक अधिवेशनाचे व द्राक्ष परिसंवादाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

उमेदवारांना 9 नोव्हेंबरला मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन,भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी .

vishwatmaklokswamivarta

सांगवी गावात दरडप्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करावा- मंत्री अनिल पाटील

vishwatmaklokswamivarta

अनाथ बालकांच्या पालकत्वासाठी समाजाने पुढे यावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर नियुक्त सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत 

vishwatmaklokswamivarta