vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

उमेदवारांना 9 नोव्हेंबरला मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन,भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी .

उमेदवारांना 9 नोव्हेंबरला मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन,भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी .

 

राज्य प्रतिनिधी :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सलेक्शन बोर्ड या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक-युवतींसाठी दि. 20 ते 29 नोव्हेंबर 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 55 पुर्व प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. तरी जालना जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.

 

सर्विस सलेक्शन बोर्ड कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवास, भोजनासह प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांनी मुलाखतीस येतेवेळी संकेतस्थळावर डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेयर पुणे सर्च करुन त्यामधील एसएसबी-55 कोर्ससाठी किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

 

केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमुद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवुन यावेत. कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेंस अकेडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘सी’ सर्टीफिकेट ‘ए’ किंवा बी ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखती साठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय. डी. traing.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्र. 0253-2451032 व व्हॉट्सप क्र. ९१५६०७३३०६ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*

संबंधित पोस्ट

एक लाख मराठा उ‌द्योजक संकल्पपूर्तीनिमित्त जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

पक्षाची विचारधारा, तत्त्वे वाचवण्यासाठी मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढत आहे मल्लिकार्जुन खरगे

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक अभिसरणाचा पाया रचला– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत,उत्सवअभिजातमराठीचा शासकीय प्रयोजनात मराठी

vishwatmaklokswamivarta