vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे· द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे· द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

 

            मुंबई, प्रतिनिधी: खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच युवा पिढीमध्ये खेळाची रूची वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर राज्यात गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असून क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

  मंत्रालयातील दालनात श्री.भरणे यांनी विभागाचा पदभार स्विकारला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला. क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक नवनाथ फडतरे यांसह अधिकारी उपस्थित होते.

  क्रीडा मंत्री श्री. भरणे म्हणाले की, क्रीडा, युवक कल्याण विभाग, अल्पसंख्याक, औकाफ विभागाच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीत भरीव योगदान देणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अल्पसंख्याक घटकांसाठीच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार असल्याची ग्वाही श्री.भरणे यांनी यावेळी दिली.

क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान-   यावेळी जलतरण क्रीडा प्रकारात योगदान देणारे पद्मश्री मुरलीधर पेटकर यांना केंद्र शासनाच्यावतीने अर्जुन (जीवन गौरव) पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल क्रीडा मंत्री श्री. भरणे यांनी सन्मानित केले. त्याचबरोबर क्रीडा मार्गदर्शक दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, गोळाफेक क्रीडा प्रकारात सचिन खिल्लारी यांना अर्जुन पुरस्कार, शूटींग क्रीडा प्रकारात स्वप्निल कुसाळे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री. भरणे यांनी सन्मानित केले. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवित देशाबरोबर राज्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत श्री. भरणे यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.0000

 

०००

संबंधित पोस्ट

भाजपाचा महापौर आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. महायुतीचे महापौर आणि उपमहापौर मुंबईच्या विकासाला नवी दिशा देतील – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या १ हजार ७९५ यात्रेकरूंची २३ वी तुकडी पोलिस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र SSC (१०वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता. निकाल पाहण्यासाठी भेट द्या: sscresult.mahahsscboard.in digilocker.gov.in

चंद्रपूर जिल्हा बँकेतील सायबर चोरी प्रकरणी मुख्यमंत्र्यांची परवानगीने विशेष तपास पथकाद्वारे चौकशी- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी केली आरोग्य तपासणी आणि साहित्य नोंदणी; लवकरच होणार साहित्य वाटप शिबीर