vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाज्योतीच्या वतीने विद्यार्थ्यांना टॅब वाटप

महाज्योतीच्या वतीने विद्यार्थ्यांना टॅब वाटप

 

रायगड प्रतिनिधी– सध्या स्पर्धेच्या काळात ऑनलाईन शिक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त झाल्यामुळे इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेच्या वतीने मोफत टॅबचे वाटप करण्यात आले आहे. विदयार्थ्यांनी याचा गुणवत्ता वाढीसाठी उपयोग करावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृह येथे महाज्योती संस्थेच्यावतीने मोफत टॅब वाटप कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते.यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते महाज्योतीमार्फत इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील २४विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप करण्यात आले.

महाज्योती योजनेअंतर्गत, विज्ञान शाखेच्या अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना MHT-CET/JEE/NEET-2025 साठी मोफत कोचिंगसाठी मोफत टॅब्लेटचे वाटप केले जाते. ज्याचा वापर करून आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाचा आणि त्यांना मिळालेल्या या सुविधांचा उपयोग करून त्यांचे भविष्य सुधारू शकतात.महाज्योती संस्थेच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत टॅब सोबत दररोज सहा जीबी इंटरनेट डेटाची सुविधा नीट परीक्षा होईपर्यंत साधारण दीड वर्षे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

000

संबंधित पोस्ट

पाणी फाउंडेशन फार्मर कप २०२६ साठी जिल्हा सज्ज; शेतकऱ्यांनी हिरीरीने सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात पद भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पतंजली विद्यापीठाचा पदवीदान समारंभ…

vishwatmaklokswamivarta

ऊर्जा संवर्धनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन

डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरावे- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta