vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

बुलडाणा, प्रतिनिधी: राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागामार्फत राज्य युवा पुरस्‍कार सन 2023-24 या वर्षाकरीता नामांकने मागविण्यात आले आहे. अर्हता धारण करणाऱ्या युवक, युवती व संस्थांनी आपले नामांकन अर्ज, प्रस्ताव दि. 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करावे, असे आवाहन, जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.

राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग, संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार शासन निर्णय दि. १२ जानेवारी २०१३ नुसार देण्यात येतात.

सन २०२३-२४ या वर्षात राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रिय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्था याना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप युवक-युवती यांना रोख ५० हजार रुपये संस्थेस 1 लाख रुपये तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.

राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांची गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज दि. 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा, संचालनालयाचे आयुक्त यांनी केले आहे.  00

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर’ निमित्त २३ फेब्रुवारी रोजी सामूहिक गीत गायन -कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक व कर्मचारी एकाच वेळी होणार सहभागी

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सद्भावना दिवस’ प्रतिज्ञा

महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण..

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना प्रति थेंब अधिक पिक योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन ‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’; मुख्यमंत्री फडणवीस यांचे साकडे

vishwatmaklokswamivarta