vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार विभागाचा आढावा नागरिकांसोबत साधणार संवाद..

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार विभागाचा आढावा नागरिकांसोबत साधणार संवाद..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी :- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार, 7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विभागातील विविध विषयांचा ते आढावा घेणार आहेत. सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय पातळीवरील आढावा घेणार आहेत. यासाठी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व अपर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दुपारी ०२ ते ०४ दरम्यान नागरिकांसाठी राखीव असून महसूलमंत्री श्री. बावनकुळे हे नागरिकांशी संवाद साधणार असून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. नागरिकांना भेटण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे.दुपारी ०४ वाजता नोंदणी महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर विभागाचा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील नोंदणी महानिरीक्षक, सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.सायंकाळी ०६ वाजता भूमी अभिलेख, छत्रपती संभाजीनगर विभागाचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी उपसंचालक, भूमी अभिलेख यांच्यासह विभागातील सर्व जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख उपस्थित राहणार आहेत.आढावा बैठका व नागरिकांना भेटीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार असे महसूल विभागाच्या अपर आयुक्त नयना बोंदर्डे यांनी कळविले आहे.

*****

संबंधित पोस्ट

कोकण किनारपट्टीला ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन ,माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन राज्यसभेवर नामनिर्देशित -चारही मान्यवरांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत -मोफत हृदय शस्त्रक्रियेकरिता 22 बालके मुंबईला रवाना

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यासाठी 132 किलोलिटर केरोसीन मंजूर,तात्पुरत्या स्वरूपात वितरण सुरू- सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके-पलूस व तासगाव तालुक्यात वाटप गतिमान, इतर तालुक्यांतही लवकरच पुरवठा…

जनगणना २०२७: नागरिकांसाठी १५ मे पर्यंत ‘स्व-गणना’ करण्याची संधी

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक शून्य अपघाती मृत्यूचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी