vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता,उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केलेली असावी

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता,उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केलेली असावी

रायगड,द प्रतिनिधी:-एकीकडे बेरोजगारी वाढत आहे तर दुसरीकडे चांगले मनुष्यबळ अनेक आस्थापनांमध्ये, कंपन्यांमध्ये मिळत नाही. अशा परिस्थितीत उमेदवारांचे कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. उद्योजक घडल्यास ते काही लोकांना रोजगार देऊ शकतात. त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यासाठी मदत होते. उद्योजकांना चांगले कर्मचारी मिळावेत, तसेच इच्छुक बेरोजगारांना काम मिळावे, यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना सुरू करण्यात आली असून उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/ संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अ.मु.पवार यांनी दिली आहे.

उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम योजना आपल्यासाठी करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) द्वारे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येते. तो कुशल, अनुभवी झाल्यानंतर त्याला चांगल्या संधी उपलब्ध होतात. रायगड जिल्यातील खाजगी आस्थापनांनी त्यांच्या मनुष्यबळाच्या उत्पादन क्षेत्रासाठी 10 टक्के व सेवाक्षेत्रासाठी 20 टक्के रिक्तपदे अधिसुचित करावीत.

वैशिष्ट्ये : https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर Intern Login मध्ये बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतील. विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप्स, विविध आस्थापना आदींना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविली जाते.- सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतात.

शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतन (प्रतिमहिना), 12 वी पास- 6 हजार, आय. टी. आय./पदविका- 8 हजार, पदवीधर / पदव्युत्तर-10 हजार, या कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) चा कालावधी 6 महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.

उमेदवारांची पात्रता:- उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास/ आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असावी. तो महाराष्ट्राचा अधिवासी असावा. आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02141-222029 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.०००

संबंधित पोस्ट

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली ‘कुंभमेळा’ विकास कामांची पाहणी सिंहस्थ कुंभमेळा २०२७

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत जालन्यातील 800 लाभार्थी आयोध्यासाठी रवाना**भाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखवली हिरवी झेंडी*

ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई

सेंट्रल पार्कची कामे गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांकडून शहरातील विकासकामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

पैठण शहरातील विविध विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ