vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक पदाची भरती

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक पदाची भरती

        बुलबुलढा प्रतिनिधी-

सेवागिरी बाबा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोताळा येथे ठोक मानधनावर निदेशक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक अर्हताधारक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मुळ प्रतिसह स्वखर्चाने दि. 17 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहावे, असे आवाहन सेवागिरी बाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य एस.डी.गगावणे यांनी केले आहे.

  आयएमसी अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी निव्वळ तात्पुरत्या मानधानावर 14 हजार रुपये प्रतिमाह प्रमाणे नव्याने संलग्नता प्राप्त झालेल्या व्यवसायाच्या रिक्त असलेले निदेशक पदे भरावयाची आहेत. इच्छुक अर्हताधारक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मुळ प्रतिसह स्वखर्चाने दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी सेवागिरी बाबा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोताळा मलकापुर रोड, जि. बुलढाणा येथे उपस्थित राहावे. सबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी, पदविका, आयटीआय पास व अनुभव असल्यास प्राधान्य राहील. पदासंदर्भातील अटीशर्ती व सविस्तर माहिती https://dgt.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.00000

संबंधित पोस्ट

चिचडोह बॅरेजचे दरवाजे उघडणार ; नागरिकांनी सतर्कता बाळगावी – प्रशासनाचे आवाहन

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जम्मू-काश्मीरमध्ये : पर्यटकांशी साधला संवाद • पर्यटकांना सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे- पर्यटकांच्या चेहऱ्यावर फुलल हास्य..

राज्यात पुढील 5 दिवस पूर्व मान्सून पाऊस कोसळणार! अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट जारी….

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ३.०’ चा तिसरा टप्पा सुरू; सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगारांची सुवर्णसंधी

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवेचा शुभारंभ, एकाच क्लिकवर मिळणार अर्जाची स्थिती व कर्ज मार्गदर्शन

उपमुख्यमंत्री पवार यांची पडेगाव येथील ‘संपूर्ण वन’ उपक्रमास भेट