vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कोंकण भवनात संत रविदास महाराज यांच्या जयंतनिमित्त अभिवादन

कोंकण भवनात संत रविदास महाराज यांच्या जयंतनिमित्त अभिवादन

नवीमुंबई, प्रतिनिधी-

समाजवादी विचारसरणी मांडणारे संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोंकण भवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

“रैदास” या नावाने प्रसिद्ध. उत्तर भारतातील एक मध्ययुगीन संत. महाराष्ट्रात रोहिदास म्हणून ओळखले जाणारे संत हेच असावेत, असे दिसते. ते काशीचे राहणारे होते. त्यांच्या वडिलांचे नाव राहू, आईचे नाव करमा व पत्नीचे नाव लोना होते. त्यांना विजयदास नावाचा पुत्र असल्याचा उल्लेख परमानंदस्वामिरचित रविदास पुराण ह्या ग्रंथात आढळतो

सत्संगतीचा परिणाम होऊन ते बाराव्या वर्षापासूनच राम व सीता यांच्या मूर्तीची पूजा करू लागले. रविदास यांची पदे ग्रंथसाहिबमध्ये आढळतात. त्यांच्या रचनाचा एकसंग्रह प्रयागहून “रैदासजी की बानीया” प्रकाशित झाला आहे. संत रविदास हे संत कबीर यांचे समकालीन असल्याचा उल्लेख आढळतो. मीराबाईनी आपल्या अनेक पदांतून रविदास हे आपले गुरु असल्याचे म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

नव्या मुंबईतील धक्कादायक बातमी -नवी मुंबईतील तळोजा येथे २.५ वर्षांच्या हर्षिका शर्माची तिच्या शेजारीनेच केली हत्या…

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी- मुंबईतील चेंबूर येथील घटना टिळक नगर येथील पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सात्विक हॉटेल मध्ये तोडफोड…

कल्याण शहरातील अद्ययावत सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ—महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते सनद वितरण..

vishwatmaklokswamivarta

भूतपूर्व सैनिक व भूतपूर्व महिला वन कर्मचाऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन (टीए) इको महारमध्ये भरती मेळावा

सेवा संकल्प अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर