vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्ह्यातील युवक-युवतींना मोफत कौशल्य विकासाची संधी;कौशल्य प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधा- जिल्हाधिकारी यांचे आवाहन

जिल्ह्यातील युवक-युवतींना मोफत कौशल्य विकासाची संधी;कौशल्य प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधा- जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

बुलढाणा,द प्रतिनिधी : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियाना अंतर्गत किमान कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सन 2024-25 करिता वयवर्ष 15 ते 45 वयोगटातील उमेदवारांना विविध अभ्यासक्रमांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील इच्छुक युवक-यवुतींनी मोफत प्रशिक्षण संधीचा लाभ घेण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आले असून सदर धोरणाची अंमलबजावणी तसेच युवक-युवतींचे विविध क्षेत्रात कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील प्रशिक्षण केंद्रातून वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण दिली जाणार आहेत. यासाठी जिल्हा व तालुकानिहाय कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रामध्ये जाऊन संपर्क साधावा.

जिल्ह्यातील कौशल्य प्रशिक्षण केंद्राची तालुकानिहाय यादी व संपर्क क्रमांक याप्रमाणे: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलढाणा (9011079317), एक्स्पर्ट स्किल ट्रेनिंग सेटर बुलढाणा(9604363517), कॉनफ्लॅय डायनामिक्स प्रा.लि. बुलढाणा(9082064151), श्री माऊली ट्रेनिंग सेंटर बुलढाणा(8605063306), नमो स्किल बुलढाणा(9834857747), स्किल बहुद्देशिय संस्था बुलढाणा (9422945811), आदर्श स्किल टेक्निकल इंस्टीट्यूट देऊळघाट(7972494535), स्वर्गीय दयासागरजी महाले स्किल डेवलपमेंट इंस्टीट्युट उदयनगर(9881285396), विदर्भ इंस्टीट्युट स्किल डेवलपमेंट चिखली (9921201831), रत्नप्रभा बहुउद्देशीय शिक्षण संस्था चिखली(99237474566), ड्रीम इंडिया चिखली (9834857747), श्री श्रेयसराज विद्या प्रतिष्‍ठान चिखली(9011872564), सहकार महर्षि स्व. भास्कराव शिंगणे शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ खामगाव(9421468083), नंद स्किल डेवलपमेंट सेंटर शेगांव (9511796299), छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था बोरखेडी मोताळा(9607972222), ब्रम्हा एजुटेक मोताळा(8668745594), पी.डी.एम. डॉ.व्ही.बी कोलते कॉलेज ऑफ इंजीनीरिंग मलकापूर(9326059560), ठाकरे स्किल डेवलपमेंट सेंटर नांदुरा(9822950344), प्रिन्स ट्रेनिंग सेंटर उंबरखेड ता. देऊळगाव राजा(8554894077), मानव विकास कौशल्य केंद्र देऊळगाव माही(9975704117), राज टेक्निकल इंस्टीट्युट देऊळगाव राजा(9022233715), राजमाता व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर सिंदखेडराजा(7385730518), प्रगती ट्रेनिंग सेंटर (9545404543), मातोश्री स्किल ट्रेनिंग सेंटर मलकापूर पांग्रा ता.सिंदखेडराजा(9766449006), राजीव गांधी आर्टस ॲड सायन्स जूनियर कॉलेज सिंदखेडराजा (8421041815).

000000

संबंधित पोस्ट

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक –  पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले…

स्वाधार योजनेअंतर्गत 16 मार्चपर्यंत अर्जांच्या त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन                                               

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवे चे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला राज्यात ‘ई-गव्हर्नन्स’ मध्ये तृतीय क्रमांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

चारचाकी वाहनासाठी एमएच-50 ए ए मालिका सुरु शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा

शोक संवेदना**भारतीय सांगीतिक संस्कृतीचा एक अमूल्य वारसा काळाच्या पडद्याआड*-पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई*पद्मविभूषण आशा भोसले यांच्यासाठी मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून शोक संवेदना*