vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

 

राज्य प्रतिनिधी-मुंबई, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. पावनगड (बी ०४) येथे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यानी अभिवादन केले.

मुंबईतील पावनगड येथील शासकीय निवासस्थानी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करुण पुष्पहार अपर्ण करण्यात आला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे,सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, रोहयो मंत्री भरत गोगावले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

डोंगरी महोत्सव विविध विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई 

एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याचे शासनाचे नियोजन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश

नवी मुंबई महानगरपालिका -स्थायी, परिवहन समितींसह प्रभाग, विशेष व तदर्थ समिती सभापतींची निवड

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालया च्याजागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच :- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा**एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*