vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याचे शासनाचे नियोजन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याचे शासनाचे नियोजन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, प्रतिनिधी- राज्यात एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

  विधानपरिषदेमध्ये सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

 राज्यातील अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जात नसल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अभियांत्रिकी विषयांची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे या परीक्षा इंग्रजी भाषेत घेतल्या जातात. पण, आता अभियांत्रिकी शिक्षणही मराठी भाषेत घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची पुस्तके आता मराठी भाषेत उपलब्ध होणार आहेत. त्या अनुषंगाने अभियांत्रिकी परीक्षांचा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार करून सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षाही मराठीमध्ये घेण्याचे नियोजन शासनाने केले असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सभागृहात दिली.

0000

संबंधित पोस्ट

रायगड आणि आसपासच्या भागांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी …

vishwatmaklokswamivarta

बकरी ईद’ निमित्त सोसायट्यांमध्ये होणारी पशूंची अवैध हत्या प्रशासनाने रोखावी!- रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जाची १८ मार्चपर्यंत मुदतवाढ

सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात ‘पद्मश्री’प्रमाणे ४ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ व २० जणांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार *हिंदु राष्ट्ररत्न-आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड, डॉ. सच्चिदानंद शेवडे;- सनातन धर्मश्री : आमदार टी. राजा सिंह, अधिवक्ता विष्णु जैन, प्रमोद मुतालिक..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खास मुलाखतीत स्पष्ट केलं की, मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच …

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस