vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधानसभा लक्षवेधी सूचना :पुणेश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांवर अन्याय होणार नाही- मंत्री शंभूराज देसाई

विधानसभा लक्षवेधी सूचना :पुणेश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांवर अन्याय होणार नाही- मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई,  प्रतिनिधी : पुणे येथील कसबा पेठेतील पुणेश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्था ही वक्फ बोर्डाची जागा असल्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणाने दिला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात स्थानिक रहिवाशांनी न्यायालयात अपील दाखल केले असून त्यानुसार जैसे थे प्रकरण ठेवण्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांवर कोणताही अन्याय होणार नाही याची शासनातर्फे पूर्ण दखल घेतली जाईल, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

  याबाबत सदस्य हेमंत रासने यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना मंत्री श्री.देसाई म्हणाले की, कसबा पेठेतील हे भूखंड १९८९ मध्ये झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. विकासकाने २०१२ मध्ये पुनर्वसन योजना सादर केली, सन २०१७ मध्ये निष्कासन करून जमीन विकासकाच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणाने ही जमीन वक्फ मिळकत असल्याचे घोषित करून पुनर्वसन आदेश अमान्य केले. या निर्णयाविरोधात विकासक व रहिवाशांनी सन २०२० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात पुनरावलोकन अर्ज दाखल केला. त्यावर मार्च २०२० मध्ये न्यायालयाने स्टेटस क्यू (Status-Quo) आदेश दिला. दरम्यान, विकासकाकडून भाडे न मिळाल्याने पुणेश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्थेने सन २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली, जी सध्या न्यायप्रविष्ट आहे. जमिनीचे भूसंपादन न झाल्याने संपूर्ण पुनर्वसन प्रकल्प थांबला आहे, असेही मंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

विशेष साहाय्य विभागाच्या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर : मंत्री नरहरी झिरवाळ

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

विशेष लेख-:मराठी-अभिजात दर्जा- मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा देणं म्हणजे चंद्राला ‘ तु किती सुंदर दिसतो ’ म्हणत आरसा दाखवण्या सारखे आहे.

vishwatmaklokswamivarta

श्रावण यात्रा काळात खाद्यपदार्थांच्या तपासणी करावी   – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश शाळेतील व परिसरातील अन्नपदार्थांची नियमित तपासणी करा श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ विक्री करताना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर वार्षिक१२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार…

सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या  उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली…..

vishwatmaklokswamivarta