vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

शेतकरी व सर्वसामान्यांना निराश करणारा अर्थसंकल्प : जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

शेतकरी व सर्वसामान्यांना निराश करणारा अर्थसंकल्प : जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

 

जालना प्रतिनिधी : आज राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य व शेतकर्‍यांची दिशाभूल व निराश करणारा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी दिली. प्रतिक्रियेत पुढे म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी महायुतीच्या वतीने राज्यातील जनते समोर मोठ मोठ्या घोषणा केल्या. लाडक्या बहिणींना त्यांचे मानधन एकविसशे रुपये करण्याचा शब्द दिला. तरुण बेरोजगारांसाठी उद्योगधंदे व नोकर्‍यांची हमी दिली होती. परंतु प्रत्यक्षात आज अर्थसंकल्पामध्ये यावर कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. तसेच शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणाही हवेत विरली असल्याचे दिसते. नवीन रोजगार निर्मितीसाठी कोणतेही ठोस कार्यक्रम नाहीत. शेतीमालालाही हमी भाव जाहीर केले नाहीत. अशा प्रकारे हा अर्थसंकल्प शेतकरी, सर्व सामान्य नागरिक व तरुणांची दिशाभूल करणारा असल्याचे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची  राज्य सरकारची तयारी- उपमुख्यमंत्री अजित पवार

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यकØ राज्य निवडणूक आयोगाचे आदेश जारीØ जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठीत…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

vishwatmaklokswamivarta

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

इनोव्हेशन’ लोकोपयोगी असावे – पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर