vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना’भारतरत्न’ पुरस्कार देण्याचा ठराव पणन मंत्री यांनी विधानसभेत मांडला…

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना’भारतरत्न’ पुरस्कार देण्याचा ठराव पणन मंत्री यांनी विधानसभेत मांडला…

मुंबई, प्रतिनिधी: क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला.

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित, वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत, सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालून, अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याच्या प्रयोजनार्थ हा ठराव मांडल आहे.

मंत्री श्री. रावल म्हणाले, भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सभागृहात सांगितले.

00000000

संबंधित पोस्ट

मेहकर बसस्थानकाचे लोकार्पण; एसटीच्या आधुनिकीकरणाचा नवा टप्पा सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ३० नवीन बसेस लवकर उपलब्ध होणार

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करा**कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल**विविध यंत्रणांकडून तयारीचा आढावा*

पद्म पुरस्कार-२०२६ साठी नामांकन सादर करण्यासाठी अंतिम मुदत; १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली

छत्रपती संभाजीनगर विभागातील नुकसान भरपाई अनुदानअनियमितता प्रकरणी चौकशी सुरू- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव