vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी, राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याचं वक्तव्य.

‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी, राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याचं वक्तव्य

प्रतिनिधी : काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असेल तर महाविकास आघाडीतील उरलेले दोन पक्ष म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवेल अशी भूमिका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आली आहे. सामनाद्वारे शिवसेनेकडून ही भूमिका मांडल्यानंतर राष्ट्रवादीनेही तिच भूमिका मांडत शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही भूमिका मांडली आहे.

 

महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत आणि या तीनही पक्षांनी एकत्र रहायला प्राधान्य दिलं पाहिजे. मात्र त्यातून एखाद्या पक्षाची स्वबळावर निवडणूक लढायचं इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील. त्यादृष्टीने सामनामध्ये मत व्यक्त केलेलं दिसतंय, असं जयंत पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितलं. तसंच ही महाराष्ट्रातील जनतेची तशी इच्छा दिसतेय, असंही ते म्हणालेत.

याप्रकरणी पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सध्या स्वबळावर निवडणूक लढवायचं म्हणतायत. पक्ष वाढवण्यासाठी कदाचित ते म्हणत असतील. पण शेवटी प्रत्येक पक्षाचं बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटीत काम करणं अपेक्षित आहे. ते आज जरी असं म्हटलं तरी निवडणुका जवळ आल्यावर ते कदाचित वेगळा विचार करू शकतील. पण त्यांनी वेगळा विचार केलाच नाही तर समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील.

 

शरद पवारांनीही राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना राज्यात महाविकास आघाडी एकत्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवेल अशी भूमिका मांडली होती. मात्र त्यानंतर काँग्रेसने स्वबळाचा नारा देणं सुरू केलं आहे. भविष्यात काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्यावर ठाम राहिला तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आलेले पहायला मिळतील.

जयंत पाटील काय म्हणाले ?

– महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत आणि या तीनही पक्षांनी एकत्र रहायला प्राधान्य दिलं पाहिजे

– त्यातून एखाद्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढायचं इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील

– त्यादृष्टीने सामना मत व्यक्त केलेलं दिसतंय

– महाराष्ट्रातील जनतेची तशी इच्छा दिसतेय

– काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सध्या म्हणतायत

– पक्ष वाढवण्यासाठी कदाचित ते म्हणत असतील

– शेवटी प्रत्येक पक्षाचं बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे

– त्यामुळे तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटीत काम करणं अपेक्षित आहे

– ते आज जरी असं म्हटलं तरी निवडणुका जवळ आल्यावर ते कदाचित वेगळा विचार करू शकतील

– पण त्यांनी वेगळा विचार केलाच नाही तर समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहती

राज्यपाल भेट

– १२ आमदारंचे प्रकरण बरेच दिवस त्यांच्याकडे आहेत

– त्यावर त्यांचा विचार झालेला नाही

– महाराष्ट्रात पूर्वी अशी प्रथा नव्हती,

 

संबंधित पोस्ट

महायुती सरकारनं तरुण उच्च शिक्षित पात्र उमेदवार दिला आहे यांना सर्वांनी मजबूत पाठिंबा द्यावा, अशी विनंती करतो. जेणेकरून त्यांना विधानसभेत पाठवू शकू आणि इथल्या विकासकामांना देखील वेग पकडण्यास मदत मिळेल. मी शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांशी कटिबद्ध आहे. त्यानुसार महाराष्ट्राला आकार देण्याचं काम करत आहे. जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीला विजयी करण्यासाठी प्रचाराला लागावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निर्देश 

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत  पालघर चे माजी खासदार राजेंद्र गावित आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे कन्या संजना जाधव यांचा जाहीर प्रवेश…

vishwatmaklokswamivarta

महाष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल! वंचितच्या सर्वच्या सर्व 35 उमेदवारांचा पराभव; प्रकाश आंबेडकरही पराभूत..

जिल्हा बँक निवडणूक वाद चिघळला : माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला..

ओबीसी आरक्षणाची मागणी करणारे लक्ष्मण हाके यांची माहिती मराठा नेते मनोज जरांगे बारामतीच्या इशाऱ्यावर माघार घेतल्याचे दावा

vishwatmaklokswamivarta